शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील प्रत्येक घटकाला संघटित करा

By admin | Updated: January 19, 2017 00:32 IST

मोठ्या प्रमाणात असलेला कुणबी समाज अजूनही विखूरलेला आहे. आपल्या समाजाची ताकद एकत्र झाल्यास ...

उषा मेंढे यांचे प्रतिपादन : साखरीटोला येथे कुणबी समाज अधिवेशनसाखरीटोला : मोठ्या प्रमाणात असलेला कुणबी समाज अजूनही विखूरलेला आहे. आपल्या समाजाची ताकद एकत्र झाल्यास आपल्यावर अन्याय, अत्याचार होणार नाहीत. आपले अधिकार जाणून घेऊन जे एका व्यक्तिला महत्व नसते ते संघटनेला महत्व असते. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करण्याची गरज असल्याचे उद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी काढले. युवा कुणबी समाज सेवा समिती साखरीटोला (सातगाव) तर्फे जिल्हा परिषद हायस्कूल साखरीटोल्याच्या पटांगणावर आयोजित कुणबी समाजाच्या अधिवेशनात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक बनगाव जि.प. सदस्य सुखराम फुंडे, अतिथी म्हणून जि.प. सदस्य लता दोनोडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) बागडे, विजय बहेकार, सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, वनक्षेत्राधिकारी एल.एस. भुते, काशिराम हुकरे, माजी पं.स.सभापती तुकाराम बोहरे व अन्य अतिथी मंचावर उपस्थित होते.संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सविता बेदरकर म्हणाल्या, समाज हितासाठी सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे. संघटनेशिवाय समाजाला महत्व नाही असे सांगत सर्वच क्षेत्रात कुणबी समाजाने पाय रोवण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी विजय बहेकार, लता दोनोडे, सुखराम फुंडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी बागडे यांनी ही मार्गदर्शन केले. यावेळी उपवर-वधू परिचय मेळावा, हळदी-कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन देवराम चुटे यांनी केले. आभार डॉ. संजय देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा कुणबी समाज सेवा स्थायी समितीचे अध्यक्ष भुमेश्वर मेंढे, सचिव कमलबापू बहेकार, प्रभाकर दोनोडे, रमेश चुटे, युवराम कोरे, युवा कुणबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष देवराम चुटे, पृथ्वीराज शिवणकर, संतोष बोहरे, रामदास हत्तीमारे, नामदेव दोनोडे, प्रकाश दोनोडे, अरविंद फुंडे, संजय बागडे, शैलेष मेंढे, निलकंठ दोनोडे, प्रेमलाल ठाकरे, राजू काळे, श्यामलाल दोनोडे, मनोज चुटे, डॉ. संजय देशमुख, डॉ. हेमंत फुंडे, संजय दोनोडे, डॉ. रमेश बोहरे, देवेंद्र मुनेश्वर, प्रकाश राऊत, टेकचंद फुंडे, माधोराव कोरे, चैतराम चुटे, मोहन दोनोडे, रमेश बहेकार, मनोज डोये व इतर समाज बांधवांनी सहकार्य केले.(वार्ताहर)समाजबांधवांचा सत्कारविविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचा व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश बागडे, विवेक बहेकार, तुकराम बोहरे, निलकंठ दोनोडे, प्रमिला फुंडे, काजल बहेकार, प्रकाश मेंढे, डॉ. विकास डोये, अनंतराम कोरे, नरेश रहिले, चंद्रकुमार बहेकार, गायत्री राऊत, श्याम डोये व अन्य लोकांचा सत्कार करण्यात आला.