शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

कर्कापुरात उघड्यावर भरली शाळा

By admin | Updated: December 2, 2015 00:33 IST

तुमसर तालुक्यातील कर्कापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत १ ते ७ या तुकड्यांना केवळ तीन शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शिक्षकांची पदे रिक्त : शाळेला कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशाराचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील कर्कापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत १ ते ७ या तुकड्यांना केवळ तीन शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी ग्रामस्थांनी आज सोमवारला विद्यार्थ्यांची शाळा उघड्यावर घेऊन जिल्हा परिषदेचे लक्ष वेधले आहे. असे करुनही शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा समस्त ग्रामस्थांनी दिला आहे.कर्कापूर येथे जिल्हा परिषदेची पूर्व माध्यमिक शाळा आहे. या शाळेत १ ते ७ तुकड्या असून तीन शिक्षक नियुक्त आहेत. या शाळेत ११८ विद्यार्थी असताना अध्यापनाचे कार्य केवळ दोन शिक्षक करीत आहेत. मुख्याध्यापक व दोन शिक्षक कार्यरत असताना एक शिक्षक वैद्यकीय रजेवर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी ग्रामपंचायत तथा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ठराव घेण्यात आले. परंतु या ठरावाची दखल घेण्यात आली. सात तुकड्यांना केवळ दोन शिक्षक असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे. आज सोमवारला शालेय वेळेत विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात गोळा झाले. यावेळी विद्यार्थ्यांनीच स्वत: तासिका घेतली. याची माहिती तुमसर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला मिळताच गटशिक्षणाधिकारी नंदनवार कर्कापूर येथे दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निष्क्रीयतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला. दरम्यान गटशिक्षणाधिकारी नंदनवार यांनी एक शिक्षक देण्याचे तोंडी आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)