शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

नदीतील विहिरीत केवळ दीड फूट पाणी

By admin | Updated: April 27, 2016 00:24 IST

जीवनदायीनी बावनथडी नदीपात्र पूर्णत: कोरडे पडले असून गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची नदीपात्रातील विहीर शेवटचीच घटका मोजत आहे.

वक्रद्वार उघडण्याचा शिवसेनेचा इशारा : बावनथडी नदी कोरडी, १७ हजार नागरिकांना तीव्र पाणी टंचाईमोहन भोयर  तुमसरजीवनदायीनी बावनथडी नदीपात्र पूर्णत: कोरडे पडले असून गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची नदीपात्रातील विहीर शेवटचीच घटका मोजत आहे. विहिरीत केवळ दीड फूट पाणी शिल्लक आहे. सहा गावातील १६ ते १७ हजार नागरिकांना तीव्र पाणी टंचाई भेडसावीत आहे. बावनथडी धरणाची दारे स्वत: उघडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.गोबरवाही येथे जिल्हा परिषदेची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. या योजनेची विहीर बावनथडी नदीपात्रात पाथरी या गावाजवळ आहे. सुमारे २५ वर्षापासून ही योजना यशस्वीपणे सुरु होती. एप्रिल महिन्यात तीव्र उन्हाळ्यात बावनथडी नदी पात्र कोरडे पडले. विहिरीचे जलस्त्रोत बंद झाले. सध्या विहिरीत केवळ दीड फूट पाणी शिल्लक आहे. संपूर्ण मे महिना शिल्लक आहे.गोबरवाही, राजापूर, चिखला, सीतासावंगी, नाकाडोंगरी, सुंदरटोला या गावात या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. १८५० नळ कनेक्शनधारक आहे. सुमारे १६ ते १७ नागरिकांना यापूर्वी मुबलक पाणी मिळत तरी होते. सध्या ही पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र आहे.प्रकल्पातून पाणी सोडणे एकमेव पर्यायप्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरु राहावी याकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडणे हा एकमेव पर्याय आहे. परंतु धरणात पाणीसाठा शिल्लक नाही.असे प्रकल्पांचे अभियंते सांगत आहेत. मृत जलसाठा नदीत प्रवाहित करता येत नाही. असा नियम त्यांनी सांगितला.शिवसेनेचे नेते तथा पंचायत समितीचे उपसभापती शेखर कोतपल्लीवार यांनी बावनथडी प्रकल्पाचे वक्रद्वार शिवसैनिकांसोबत स्वत: उघडण्याचा इशारा प्रशासनाला दिला. प्रकल्पात जलसाठा आहे. निदान पिण्याकरिता पाणी सोडावेच लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली.पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता धनंजय बावनकर व इतर अधिकाऱ्यांनी बावनथडी नदी पात्रातील विहिरींची पाहणी केली. केवळ दीड ते दोन फुट पाणी विहिरीत शिल्लक असल्याचा अहवाल त्यांनी प्रशासनाकडे पाठविला आहे.येथे पाणी पेटण्याची शकयता नाकारता येत नाही.बावनथडी नदी पात्राशेजारील १० ते १५ गावातील शेतकऱ्यांनी ऊस व इतर भाजीपाला लावला. ऊस पिकांना पाणी नाही. त्यामुळे ते जळण्याच्या स्थितीत आहेत. भाजीपाल्याच्या शेतीचे नुकसान झाले आहे.बावनथडी धरणातून पाणी प्रशासनाने न सोडल्यास आपण स्वत: शिवसैनिकांसोबत प्रकल्पाचे वक्रद्वार सुरु करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. पाणी समस्या दूर करणे प्रशासनाचे काम आहे.- शेखर कोतपल्लीवार, उपसभापती, पं.स. पवनीगोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत केवळ दोन फुट पाणी साठा उपलब्ध आहे. मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणारत आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने जलस्त्रोत नाही.- धनंजय बावनकर, उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा विभाग, पं.स. तुमसर