शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत केवळ ३८ प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: May 11, 2017 00:18 IST

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून मदत दिली जाते.

योजनेला अल्प प्रतिसाद : गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनादेवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून मदत दिली जाते. दोन वर्षांत जिल्ह्यातील ८८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, केवळ ३८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ११ प्रस्ताव नामंजूर झाले असून २९ प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आले आहेत. कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी १० प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले आहे. दरम्यान ही प्रक्रिया किचकट असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची पायपीट होत आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने २००५-०६ मध्ये शेतकरी व्यक्तीगत दुर्घटना विमा योजना सुरू केली. त्यानंतर २००९-१० मध्ये या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता दुर्घटना विमा योजना असे नामकरण करण्यात आले. २०१५-१६ मध्ये या योजनेचे नाव बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे. नियम व अटी जाचक असल्याने अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. शेतकऱ्यांच्या अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आले तरीही या योजनेचा लाभ देण्यात येतो. विमाधारक शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी, एक डोळा व एक अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या हानीसाठी दोन लाख रूपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्यात येते. त्यासाठी अपघाग्रस्त व्यक्ती शेतकरी आहे का? अपघाताचा पंचनामा व इतर सोपस्कार करण्यात येत असल्याने मदत मिळण्यासाठी विलंब होतो. विमा मिळविण्यासाठी योजना चांगली असली तरी दोन लाख रूपयांसाठी विविध प्रकारची कागदपत्रे वेगवेगळ्या कार्यालयातून संकलित करावे लागतात. ग्रामीण भागात कागदपत्र सहज मिळत नसल्याने समस्या बिकट बनली आहे. बहुतांश शेतकरी विमा काढण्याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक विवंचनेमुळे विम्याचे हप्ते भरण्यासाठी अडचणी येतात. दरम्यान, शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. परंतु दरवर्षी विमा कंपनी बदलत असल्याने शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळण्यासाठी मर्यादा येत आहेत. २०१५-२०१६ मध्ये ८५ प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र ३८ शेतकरी अपघात विमा योजनेत पात्र ठरले आहे. २०१६-२०१७ मध्ये जिल्ह्यात केवळ ३ प्रस्ताव दाखल करण्यात आले. त्यातील एक प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आले असून दोन प्रकरणे आवश्यक त्या कागदपत्राच्या पुर्ततेअभावी प्रलंबित आहेत.