शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

रबीचा केवळ १० टक्के पीक विमा

By admin | Updated: January 23, 2017 00:16 IST

जिल्ह्यात ४६ हजार १५७ हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली.

१ हजार ७७२ शेतकऱ्यांचा सहभाग : ४६ हजारांपैकी ४,२१६ हेक्टरवरील पिकांचा समावेशदेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात ४६ हजार १५७ हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. या पिकांना सुरक्षेचे कवच मिळावे म्हणून रबी हंगाम २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. जिल्ह्यातील ४ हजार २१६ हेक्टर रबी क्षेत्राला पीक विम्यातून सुरक्षित करण्यात आले आहे. यात १ हजार ७७२ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.जिल्ह्यात आॅक्टोंबर २०१६ पासून रबीची पेरणी करण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर संभाव्य नैसर्गिक आपत्ती, कीड व अळींचा हल्ला, उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान आदी बाबींमध्ये रबी पिकांना सुरक्षा मिळावी, तसेच शेतकऱ्यांना त्याची आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, या दृष्टिकोणातून जिल्ह्यात पीक विमा योजनांची घोषणा करण्यात आली. शिवाय पिकांचा विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर घोषित करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांकडून योजनेस अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. प्राप्त अहवालानुसार, पीक विमा योजनेत सहभाग नोंदवित जिल्ह्यातील सातही तालुक्यातील १ हजार ७७२ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत ३ लाख ९८ हजार ५६२ रुपयांचा हप्ता भरला आहे. यातून ४ हजार २१६ हेक्टर रब्बी क्षेत्र सुरक्षित झाले आहे. एकूण क्षेत्रापैकी केवळ १० टक्के याचे प्रमाण आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक अग्रेसररबी हंगाम २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. जिल्ह्यातील ४ हजार २१६ हेक्टर रबी क्षेत्राला पीक विम्यातून सुरक्षित करण्यात आले आहे. यात १ हजार ७७२ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सर्वाधिक १,४५५ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत सहभाग नोंदवून अव्वल स्थान पटकाविला आहे. त्याच बरोबर अलाहाबाद बँकेत १७८ शेतकरी, आंध्रा बँक ९, बँक आॅफ इंडीया १८, कॅनरा बँक ८४, पंजाब नॅशनल बँक २२, युनियन बँकेत ०५ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.