शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:56 IST

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून २००५ पूर्वी नियुक्ती दिलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनीच पेन्शन मिळावी, या मागणीला घेऊन शनिवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने आक्रमक पावित्रा अवलंबविला. संघटनेने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत मागण्यांचे निवेदन दिले.

ठळक मुद्देविदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना आक्रमक । शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून २००५ पूर्वी नियुक्ती दिलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनीच पेन्शन मिळावी, या मागणीला घेऊन शनिवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने आक्रमक पावित्रा अवलंबविला. संघटनेने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत मागण्यांचे निवेदन दिले.एकीकडे सभागृहात कोणतीही चर्चा न करता आमदार खासदार आपल्या पेन्शन वाढीचे बिल त्वरित पास करतात तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुढाकार घेत नाहीत नवीन पेन्शन योजना पूर्णपणे कुचकामी ठरली आहे. नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी असती तर या योजनेला विरोधच झाला नसता. सर्वांना जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आग्रही आहे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जुन्या पेन्शनच्या मागणीसह एक तारखेला नियमित वेतन अदा करणे, वैधकिय प्रतीपूर्ती देयके, भविष्य निर्वाह निधी प्रकरणमे निकाली काढणे, अतिरिक्त शिक्षकांचे जिलास्तरावर समायोजन करणे,समायोजन होईपर्यंत जुन्याच शाळेतून पगार सुरू ठेवणे, सेवानिवृत्त कर्मचारी यांचे पगार सातव्या वेतन आयोगानूसार निश्चित करून पेंशन प्रकरणे निकाली काढणे, नगर परिषद शिक्षकांच्या जीपीएफ पावती वेतन पथक कार्यालयामार्फत देणे, अंशत: अनुदानीत शाळा व तुकडीवरील शिक्षकांना वैधकिय प्रतीपूर्ती योजना लागू करणे, कस्तुरबा गांधी विद्यालय चान्ना येथील प्रकरणाची चौकशी करणे, नगरपालीका व महानगर पालीका शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करणे ,संच निर्धारणात शिक्षकेत्तर कर्मचाºयाची पदे मंजूर करणे, अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून मान्यता देवून त्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे या मागण्यांचा समावेश आहे.शनिवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष व्ही. यू. डायगव्हाणे यांचे नेतृत्वात नागपूर येथील संविधान चौकात तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दुपारी २ ते ५ वाजताच्या दरम्यान धरणे देऊन शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.या धरणे आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे यांनी केले. जिÞलाध्यक्ष सुधाकर देशमुख, टेकचंद मारबते, भाऊराव वंजारी, अनंत जायभाये, विलास खोब्रागडे, समशाद सय्यद, पुरूषोत्तम लांजेवार आदींनी सभेला मार्गदर्शन केले. संघटनेचे जिला कार्याध्यक्ष चंद्रशेखर राहांगडाले यांनी संचालन तर आभार शाम घावड यांनी मानले. यावेळी रंजनकुमार डे, मेघराज अंबादे, भीष्मा टेंभुर्ने, धीरज बांते, पंजाब राठोड, कांता कामथे, छाया वैध, अर्चणा भोयर, दिनकर ढेंगे, उमेश पडोले, विजय देवगीरीकर, अनिल कापटे, नाम घावल, मोरेश्वर वझाडे, प्राथमिकचे दारासींग चव्हाण, धनवीर कानेकर, प्रभाकर मेश्राम, अरविन्द नानोटी, दिपिका ढेंगे, कुणाल जाधव तसेच खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.आंदोलनाला पाठिंबापेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याबरोबरच सर्व कर्मचारी ३० ते ३५ वर्षे शासनाला सेवा देतात व्यवसाय कर, इन्कम टॅक्स नियमित देण्यात कसुर करीत नाही शासनाच्या योजना राबवितात निवडणूक, जनगणना, यासारखे अनेक कामे तनावपुर्ण वातावरणात देखील पार पाडतात त्यामुळेच त्यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी स्वत: व कुटूंबासाठी पेन्शनची गरज असते. या आंदोलनाला या धरणे आंदोलनास खाजगी प्राथ. शिक्षिक संघ व कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ भंडारा तसेच अनेक सामाजिक शैक्षणिक संघटनांनी पांठीबा दिला.जुनी पेंशन योजना पुन्हा लागू करावील या मागणीला घेऊन वेळोवेळी अनेक शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. सदर पेंशन योजनेवर आमचा हक्क असताना तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, या भूमिकेवर संघटना लढा देत आहेत. यावर शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.