शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अभयारण्यात वाढली वन्यप्राण्यांची संख्या

By admin | Updated: June 22, 2014 23:53 IST

जंगलातील झाडे कापण्यावर प्रतिबंध प्राणी चराईवर बंदी जंगलातून सरपत आणण्यावर बंदी, जंगली प्राण्याच्या शिकारीवर बंदी, जंगला विषयी, प्राण्याविषयी ग्रामीण जनतेत केलेली जनजागृती आदी

गोसेबुज : जंगलातील झाडे कापण्यावर प्रतिबंध प्राणी चराईवर बंदी जंगलातून सरपत आणण्यावर बंदी, जंगली प्राण्याच्या शिकारीवर बंदी, जंगला विषयी, प्राण्याविषयी ग्रामीण जनतेत केलेली जनजागृती आदी कारणामुळे उमरेड-करांडला अभयारण्या अंतर्गत येणाऱ्या पवनी वन्यजीव परिक्षेत्रात पहिल्याच वर्षी सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले आहेत.पहिले वर्ष या अभयारण्यातील जंगलाचे संरक्षण करण्यातच गेले. केलेल्या उपायोजनांमुळे जंगलातील वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या दिवसात हे अभयारण्य विदर्भातील एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून समोर येणार आहे. आज जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने अभयारण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारासोबत या अभयारण्याला भेट दिली असता अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले. या भेटीदरम्यान या अभयारण्यात मोठ्या संख्येने हरिण, सांबर, चितळ, बायसन, नीलगाय, जंगली डुकरांचे कळप, मोरांचे थवे दिसून आले. रस्त्यावर वाघ व बिबट्याचे जाण्याचे परामार्क दिसले.या अभयारण्यात खापरीगेटमधूनच वन्यजीव प्रेमी, पर्यटकांना प्रवेश देण्यात येत आहे. या अभयारण्यात फिरण्याकरिता ४० किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. हे पवनी वन्यजीव वनक्षेत्र ५० चौरास किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याकरिता रस्त्यावर अनेक ठिकाणी पुलांची, रपट्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगली प्राण्यांना पिण्याकरिता पाणी मिळावे म्हणून जागोजागी कृत्रिम पानवठे तयार करण्यात आले आहेत. जंगलात अगोदरच पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत, तलाव आदी ही आहेत. पक्ष्यांना पिण्याकरीता मडक्यात पाण्याची व्यवस्था जागोजागी करण्यात आली आहे.डोंगर महादेव रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या पानवठ्यावर कोरंभीच्या जवळील चंडीका मातेच्या उगम स्थानावरील तलावावर, गोसीखुर्द धरणाच्या बॅक वाटरवर, खापरीच्या तलावावर, पाहुणगाव जवळील शांत भत्तनसरा तलावाजवळ, रानाई तलाव आदी स्थानांवर वन्यप्राण्यांचे मोठ्या संख्येने कळप पाणी पिण्यासाठी येत आहेत. या पार्इंटवर हमखास वन्यप्राणी दिसतात. या भेटीत या पार्इंटवरच मोठ्या संख्येने वन्यप्राणी दिसून आले. या दौऱ्यात वनक्षेत्रअधिकारी व्ही.जे. गायकवाड, वनक्षेत्र सहायक वाय.एस. शेंदरे, जी.एस. शेगावकर आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)