शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

एनएसएस विद्यार्थी शाळाबाह्यांच्या ‘शोधार्थ’

By admin | Updated: January 30, 2016 00:50 IST

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या शोध मोहिमेत शिक्षण विभागाने ....

स्वयंसेवी संस्थांनाही दिले महत्त्व : ८५९ गावांमध्ये शोध मोहीम, शाळाबाह्य २५ विद्यार्थी सापडले, मोहिमेचा आज शेवट प्रशांत देसाई भंडाराशाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या शोध मोहिमेत शिक्षण विभागाने आता राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे. जिल्ह्यातील ८५९ गावातून ही मोहिम राबविण्यात येत असून यासाठी एनएसएसचे २ हजार ७८१ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडून त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने नानाविध योजना अंमलात आणल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे किंवा अन्य कुठल्या कारणाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर रहावे लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी व एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने राज्यभर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविली होती. या महिमेत शिक्षण विभागाला बऱ्यापैकी यश आले. त्यानंतर दुसरी शोध मोहिम राबविण्यात आली. या दोन्ही मोहिमेत जिल्ह्यात २४९ शाळाबाह्य विद्यार्थी आढळले. यानंतरही अनेक ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राज्य शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधार्थ शिक्षण विभागासोबत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांचा व स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे. ही शोध मोहिम उद्या ३० जानेवारीपर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही मोहिम जिल्ह्यातील ८५९ गावांमधून राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी एनएसएसचे २ हजार ७८१ स्वयंसेवकांची मदत घेतली असून १३३ समन्वयक व सात सनियंत्रन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात २५ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे या शोध मोहिमेत आढळून आले आहे. यात सर्वाधिक १९ मुले भंडारा तालुक्यात तर मोहाडी पाच व तुमसर येथे एक विद्यार्थी आढळला आहे. पहिल्या सर्वेक्षणात आढळलेल्या २४९ शाळाबाह्य मुलांपैकी २२१ मुलांना शाळेत दाखल करण्यात आले. तर उर्वरित ५३ मुले त्यांच्या मुळ जिल्ह्यात किंवा राज्यात परत गेल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. या सर्वेक्षणातील मुलांनाही शाळेत दाखल करून घेण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्था व एनएसएस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच असा सर्वे होत असल्याने त्यांच्या सर्वेक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.