शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आता तुम्हीच सांगा साहेब, शेती कसायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:23 IST

युवराज गोमासे करडी (पालोरा) : कोरोना परिस्थितीत लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला. हाताला काम नसल्याने पैशांची टंचाई निर्माण झाली. अद्यापही खरिपातील ...

युवराज गोमासे

करडी (पालोरा) : कोरोना परिस्थितीत लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला. हाताला काम नसल्याने पैशांची टंचाई निर्माण झाली. अद्यापही खरिपातील धानाची वेळेत उचल न झाल्याने गोडावूनअभावी रबीची खरेदी रखडली आहे. राज्य शासनाने खरिपातील धानासाठी प्रती क्विंटल ७०० रुपयांचा बोनस जाहीर केला. परंतु अजूनही मिळालेला नाही. एकीकडे दुप्पटीने खर्च वाढला आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा साहेब, शेती कसायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्याकडून विचारला जात आहे.

करडी, पालोरा, देव्हाडा व मुंढरी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतात. शासनाने मागील हंगामात धानाला ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर केला होता. परिणामी शेतकऱ्यांनी आपला धान शासकीय धान खरेदी केंद्रांवर विक्री केला. मात्र दोन हंगाम संपूनही आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा झालेली नाही.

शासकीय हमीभाव केंद्रांवर अ-ग्रेडच्या धानाला १८८८ रुपये तर ब-ग्रेडच्या धानाला १८६८ रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला. याशिवाय ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आधारभूत किंमत व बोनसची रक्कम मिळून शासकीय हमीभाव केंद्रांवर धान विकणे चांगले परवडणारे असल्याने शेतकऱ्यांनी येथे मोठ्या प्रमाणावर धान विक्री केले. सहा महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही धानाच्या बोनसची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बोनससंदर्भात विचारपूस करण्यासाठी शेतकरी वारंवार खरेदी-विक्री केंद्रांवर तसेच बँकांच्या चकरा मारत असल्याचे दिसत आहेत.

शेती मशागतीसाठी नांगरणी, बी-बियाणे खरेदी, खते, कीटकनाशके, मजुरांची रोजी, वाढलेला मशागतीचा खर्च याकरिता पैशांची अडचण निर्माण होत असून राज्य शासनाने शेतक-यांच्या अडचणी गांभिर्याने घेऊन धानाच्या बोनसची रक्कम त्वरित त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी होत आहे. मागील वर्षी योग्य भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी सर्वाधिक धान शासकीय हमीभाव केंद्रांवर विक्री केले. त्याचे चुकारे तर मिळाले, पण राज्यशासनाने जाहीर केलेली बोनसची रक्कम द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नीलिमा इलमे यांनी केली आहे.

बॉक्स

शेतीसाठी विशेष पॅकेजची गरज

लॉकडाऊन संपला आणि शेतीचा हंगाम सुरु झाला. त्यातच खत, बियाणे, कीटकनाशके व मजुरीच्या खर्चात मोठी झाली. पेट्रोल व डिझेलने शंभरी गाठल्याने मशागतीच्या खर्चात एकदम १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी शेती व शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी व शेतीला वाचविण्यासाठी विशेष पॅकेज घोषित करण्याची गरज जाणकारांत व्यक्त होत आहे.