शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

आता रेती तस्करांची खैर नाही

By admin | Updated: May 23, 2014 23:41 IST

रेतीचे अवैध खणन व अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी समन्वय साधून पथकाद्वारे संभाव्य ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल करावे,

अवैध वाहतुकीवरही लगाम : जिल्हाधिकार्‍यांनी दिले गुन्हे नोंदविण्याचे आदेश

भंडारा : रेतीचे अवैध खणन व अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी समन्वय साधून पथकाद्वारे संभाव्य ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी माधवी खोडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हातरीय समितीची सभेत त्या बोलत होत्या. या आदेशामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने पीआयएल क्रमांक २९/२०१४, ९ मे २०१४ रोजी रेती उत्खणन व वाहतुकीवर दिलेल्या स्थगिती आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची सभा घेण्यात आली. उच्च न्यायालयाने उक्त पीआयएलमध्ये दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व सुरू असलेल्या रेतीघाटाला तात्काळ बंद करून त्यांना देण्यात आलेल्या वाहतूक पासेस तात्काळ जमा करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. उक्त आदेश हा संपूर्ण राज्यभर लागू असल्याने इतर राज्य व जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात रेतीची वाहतूक करताना प्रवेश करणार्‍यांवरसुद्धा कायद्यानुसार कारवाईचे स्पष्ट निर्देश पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना देण्यात आले. सर्व रेती घाटाची व्हीडीओग्राफ करण्याबाबत तहसीलदार व पोलीस अधिकारी यांना निर्देश देण्यात आले. याशिवाय यापूर्वी कार्यान्वित असलेल्या मौजा शहापूर, टोल प्लॉझा, लाल बहादूर शास्त्री चौक, वाही, सातोना, जांबकांद्री, मुंडीपार फाटा व लाखांदूर येथील टी पार्इंट येथील चेकपोस्ट तात्काळ सुरू करून त्यावर पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी यांच्या चमूची २४ तासांकरीता नेमणूक करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डा. माधवी खोडे यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)