शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

आता विधानसभेच्या कामाला लागा

By admin | Updated: June 16, 2014 23:21 IST

कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांंनी केले. राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच खा.प्रफुल पटेल भंडारा येथे आले.

काँग्रेस-राकॉची संयुक्त बैठक : प्रफुल पटेल यांचे आवाहनभंडारा : कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांंनी केले. राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच खा.प्रफुल पटेल भंडारा येथे आले. स्थानिक गुजराती समाजवाडी सभागृह, जलाराम चौक, येथील आयोजित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षातर्फे आयोजित बैठकीसाठी उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले, विधानसभा निवडणुका मध्ये लोकसभा निवडणुकाप्रमाणे सत्ता परिवर्तनाची शक्यता नसल्याचे सांगितले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाचे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार डॉ.बबनराव तायवाडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. पराभवासाठी कोणत्याही कार्यकर्त्याला दोष देणार नाही. आपल्या कार्यप्रणालीतही काही दोष होता असे वाटत नाही. इतकी वर्ष राजकारण करीत असताना या जिल्ह्यातील लोक मला आणि माझ्या कार्यपद्धतीला ओळखत नाही असे होऊ शकत नाही. देशभरात माझ्या सारखे मतदार संघासाठी तळमळीने काम करणारे मोजके खासदार होते. मी कधीही जात, पात, धर्माचे राजकारण केले नाही. लोकांनी जर विकासाऐवजी अन्य गोष्टी ना महत्व दिले असेल तर माझा काय दोष. भंडारा गोंदिया या मतदार संघासाठी सिंचनापासून तर उद्योग रोजगार वाढीसह प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. या जिल्ह्यांना राज्यात आणि देशात वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतु विकासाच्या या वाटेवर लोकांनी आपली साथ अर्ध्यातच सोडली. मला या निवडणुकीत हारण्याचे दु:ख नाही. मात्र एका लोकप्रतिनिधीने नेमके कसे काम करावे म्हणजे लोकांची अपेक्षापूर्ती होईल असा प्रश्न पडला आहे. अशी भावना माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली. यावेळी मंचावर आ.अनिल बावनकर, आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, महाडाचे सभापती नाना पंचबुद्धे, उद्योगपती मुकेश पटेल, माजी आमदार आनंदराव वंजारी, अर्बन बॅकेचे अध्यक्ष अ‍ॅड.जयंत वैरागडे, मधुकर सांबारे, नरेश डहारे, सागर गणवीर, वर्षा धुर्वे, सीमा भुरे, नलीनी कोरडे व बबनराव तायवाडे उपस्थित होते. संचालन धनंजय दलाल व प्रास्ताविक अविनाश ब्राह्मणकर व आभार प्रदर्शन जिया पटेल यांनी केले. याप्रसंगी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)