शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आता विदर्भ राज्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:08 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण विदर्भभर ११ ही जिल्ह्याच्या ठिकाणी व १२० तालुक्याच्या ठिकाणी सामुहिक उपोषण (आत्मक्लेश) आंदोलन २ आॅक्टोंबरला गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी आंदोलन : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण विदर्भभर ११ ही जिल्ह्याच्या ठिकाणी व १२० तालुक्याच्या ठिकाणी सामुहिक उपोषण (आत्मक्लेश) आंदोलन २ आॅक्टोंबरला गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात येणार आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या ५ वर्षात स्वतंत्र विदर्भासाठी अनेक आंदोलने केली, त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या घरावर ठिय्या आंदोलन, नितीन गडकरींच्या घरावर ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, रेल रोको आंदोलन, विधान भवनावर मोर्चा, विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन, खासदारानो राजीनामे द्या, आंदोलन, धरणे, मेळावे आदी बरीच आंदोलने केली परंतू भाजपा सरकार म्हणजे गेंड्याच्या कातड्याचे सरकार आहे. त्याला जागच येत नाही. स्वातंत्र्यानंतर जनतेच्या मागणीला, जनतेच्या आंदोलनाला प्रतिसाद न देणारे हे भाजपाचे एकमेव सरकार आहे. यांना फक्त सत्ता पाहिजे जनतेची मागणी व जनतेचे प्रश्न सोडविणे हे त्यांना नको आहे.१९९७ ला भाजपान भुवनेश्वर भाजपा कार्यकारिणीचा विदर्भाचा ठराव केला तेव्हा अटलजींना झारखंड, छत्तीसगड, उत्तरांचल तीन नविन राज्ये दिली परंतू विदर्भ दिला नाही. तेव्हा ही विदर्भावर अन्याय केला. २०१४ च्या निवडणूकीत तर विदर्भातील दोन्ही मोठे नेते यांनी आश्वासनच दिले होते की केंद्रात आमचे सरकार आले की आम्ही विदर्भ देणारच, विदर्भाच्या नावावरच त्यांन विदर्भामध्ये निवडणूका लढविल्या, आंदोलने केली परंतू ४ वर्ष सत्ता येवुन झाले २०१९ च्या निवडणूकीमध्ये पुन्हा सत्तेमध्ये येण्याची जारदार तयारी सुरु केली परंतु मागील निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्ती केली नाही व आता तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष म्हणतात भाजपाच्या अजेंड्यावर विदर्भ नाही.म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीही निवडणुकीत आंदोलन समजून विदर्भातील जनतेस आवाहन करते कि, विदर्भाच्या जनतेच्या मतपत्रिकेवर भाजपा नाहीच, तुमच्या अजेंड्यावर विदर्भ नाही तर विदर्भाच्या जनतेच्या मतपत्रिकेवर भाजपना नाही, हे ही निवडणूक आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समिती जोरात राबणार आहे.२ आॅक्टोंबर संपूर्ण विदर्भातील ११ ही जिल्ह्याच्या ठिकाणी व संपूर्ण विदर्भातील तालुक्याचा ठिकाणी १ दिवसीय सामुहिक उपोषण स्वतंत्र विदर्भासाठी करण्यात येणार . त्यात जनतेने सामील व्हावे व त्यानंतर विदर्भासाठी आंदोलन अजून तिव्र करण्यात येणार आहे.आज ११ सप्टेंबरला रोजी विदर्भ आंदोलन समितीची पवनी तालुक्याची सभा पवनी मच्छी उत्पादक सह. संस्ोिच्या सभागृहामध्ये घेण्यात आली. सभेमध्ये तालुका कार्यकारीणी तयार करण्यात येऊन जिल्हा समितीवर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झालेले हिरालाल खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले.सदर जिल्हा अध्यक्ष देवीदास लांजेवार यांचे अध्यक्षतेखाली मुख्य संयोजक राम येवले, रंजना गांगर्डे, मुकेश मासुरकर, प्रकाश पचारे, हिरालाल खोब्रागडे, मंगलमुर्ती सोनकुसरे, उमरेडकर, भगवान झंझाड, मोरेश्वर बोरकर, यशवंत बिरे, प्रल्हाद हुकरे, भाऊराव बन्सोड, दिपक उमरेडकर, गोपीनाथ वैद्य, फिरोज मोहरकर, वासुदेव गिºहेपुंजे, यादोराव मेंगरे, प्रमोद चावरे, मार्कंड हुकरे, नागोराव शिंदे, ओमप्रकाश हटवार, अरविंद लांजेवार, जयदेव कोसरे, राधेशाम ठोंबरे यांच्या उपस्थित पार पडली. प्रास्ताविक समितीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पचारे व संचालन हिरालाल खोब्रागडे यांनी केले.