शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आता गावागावांत बाल संरक्षण समिती

By admin | Updated: January 24, 2015 22:50 IST

बालकांना अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण, बालसंरक्षणाविषयी जागृती, बालकांवरील अन्याय व अत्याचाराला आळा घालणे याच बरोबर बाल हक्क कायद्याची

भंडारा : बालकांना अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण, बालसंरक्षणाविषयी जागृती, बालकांवरील अन्याय व अत्याचाराला आळा घालणे याच बरोबर बाल हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने गावागावांत ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बैठकीत जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक गावात ११ सदस्यीय, तालुकास्तरावर १७ आणि नगरपालिका स्तरावर प्रभागनिहाय १२ सदस्यीय समिती २६ जानेवारीला स्थापन होणार आहे.राज्य शासनाने १० जून रोजी अध्यादेश पारीत केला होता. त्यानुसार बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये सरपंच किंवा ग्रामपंचायतीने नियुक्त केलेला प्रतिनिधी अध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका सदस्य सचिव राहील. याशिवाय पोलीस पाटील, आशा सेविका, अनुदानित प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अथवा शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलगा आणि मुलगी याबरोबरच स्वयंसेवी संस्था, बचतगट, महिलामंडळ आदी स्वयंसेवी संस्थांचे तीन सदस्य मिळून एकूण ११ सदस्य या समितीत राहतील. तालुकास्तरीय समितीत तहसीलदार अध्यक्ष, वरिष्ठ बाल विकास प्रकल्प अधिकारीे सदस्य सचिव आणि बिडीओ, पोलीस अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, आरोग्य विभाग, शिक्षण विभागाचा प्रत्येक एक आणि ग्राम बाल संरक्षण समितीचे पाच प्रतिनिधी, १२ ते १८ वर्ष वयोगटातील दोन मुले व दोन मुली तसेच स्वंसेवी संस्थांचे प्रतिनिधी राहतील. भंडारा, पवनी, तुमसर येथील प्रभागनिहाय समितीत नगरसेवक किंवा नगरसेविका, अध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका सदस्य सचिव असेल. शिक्षणाधिकाऱ्यांद्वारे नियुक्त एक मुख्याध्यापक किंवा शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पोलीस ठाण्यातील नियुक्त बाल संरक्षण अधिकारी, सामाजिक संस्थांचे दोन प्रतिनिधी एक वैद्यकीय अधिकारी, १२ ते १८ वयोगटातील दोन मुली आणि एक मुलगा अशी समितीची रचना असेल.(नगर प्रतिनिधी)