शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेण्याची गरज

By admin | Updated: June 9, 2017 00:37 IST

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी राज्यात एकीकडे आंदोलनाचे सत्र सुरू असताना दुसरीकडे

नाना पटोले : शेतकरी आत्महत्यांनी व्यथितलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी राज्यात एकीकडे आंदोलनाचे सत्र सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्रही कायम आहे. अशावेळी शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. असे असताना राज्याचे मुख्यमंत्री वेळकाढू धोरण अवलंबित आहे. मुख्यमंत्री महोदय, कर्जमाफीसाठी आणखी किती शेतकरी आत्महत्यांची वाट पाहणार असा संतप्त सवाल खासदार नाना पटोले यांनी केला.खोलमारा येथील ईश्वर मदनकर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी आले असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण स्वत: गंभीर असून राजकारण बाजुला ठेऊन मी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहीन. काँग्रेसमध्ये असताना आमदारपदाचा राजीनामा दिला होता, याची आठवण करून देत संकटातील शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी खा. नाना पटोले म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून नापिकी, दुष्काळ अशा विविध संकटांनी शेतकरी त्रस्त असून शेतकऱ्याला तात्काळ मदतीची गरज आहे. कर्जमाफीबाबत आपण अनेकवेळा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही. शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्यांनी आंदोलने थांबली पाहिजेत. ईश्वर मदनकर सारख्या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या करावी, ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. मी प्रथम शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. शेतकरी जगला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही माझी पहिली मागणी आहे. यापूर्वीही आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेठून उठल्याची आठवण त्यांनी करून दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी करीत शेतकऱ्यांच्या पाठिशी कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार असल्याचे स्पष्ट केले.