शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता नव्हे, हा तर मृत्यूमार्ग

By admin | Updated: November 4, 2016 00:54 IST

अत्यंत रहदारीचा रस्ता असूनही मागील दोन दशकांपासून रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही.

भंडारा : अत्यंत रहदारीचा रस्ता असूनही मागील दोन दशकांपासून रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. वर्तमानस्थितीत रस्त्याहून जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण नव्हे तर चक्क मृत्युला निमंत्रण देण्यासारखे आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर ते दिवाण सभागृहापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा गर्भित इशाराही येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे. यापूर्वीही या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र ‘पळसाला पाने तीनच’ या युक्तीप्रमाणे या निवदेनालाही केराची टोपली दाखविण्यात आली. शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर ते दिवाण सभागृहापर्यंतचा रस्ता ठिकठिकाणाहून उखडलेला आहे. मागील २० वर्षांपासून या रस्त्याची अवस्था जैसे थे अशीच आहे. या रस्त्याहून हनुमान नगर, आनंद नगर, समृद्धीनगर, अष्टविनायक नगर, आॅफीसर कॉलनी, म्हाडा कॉलनी, अंबिका नगर तसेच खात रोड परिसरातील नागरिक रहदारी करीत असतात. शहरातील मुख्य मार्गाला जोडणारा रस्ता म्हणूनही याची ओळख आहे. भरगच्च वस्ती असलेल्या प्रभागातील नागरिक या रस्त्याने रहदारी करीत असले तरी नगरपालिका प्रशासन रस्त्याच्या बांधकामाकडे का दुर्लक्ष करीत आहेत हे एक न सुटणारे कोडे आहे. ठिकठिकाणाहून गिट्टी उखडलेली असल्याने दुचाकीस्वार अनेकवेळा स्लीप झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या उग्र रुप धारण करीत असते.मागील दोन दशकांपासून ही समस्या असताना नगरपालिका प्रशासनाने निवेदनाच्या माध्यमातून अनेकदा कळविण्यात आले. प्रभागातील नगरसेवकांचे आपसामध्ये समन्वय नसल्यामुळे या रस्त्याची समस्या ही कायम आहे. या मार्गाहून जवळपास २ हजार नागरिक रहदारी करीत असल्याचे कळते. विशेष करून महिलांना व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. प्रभागातील चारही नगरसेवकांना या समस्येबाबत कळविण्यात आले. कुणीही या रस्त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. परिसरातील नागरिकांकरिता शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बसस्थानक, बाजार अशा मूलभूत स्थळी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. परंतु रस्त्याची दूरवस्था झाल्याने जीव धोक्यात घालून रहदारी करावी लागत आहे. सदर रस्त्याचे त्वरीत बांधकाम करून परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी आर्त हाक येथील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिल्यास ही समस्या मार्गी लागू शकते. (प्रतिनिधी)