शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

मानवी जीवाच्या विषयावर राजकारण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

भंडारा : गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या कडू आठवणी सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. दिवसाचे लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. गरीब, गरजू, लघू व मध्यम व्यापारी ...

भंडारा : गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या कडू आठवणी सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. दिवसाचे लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. गरीब, गरजू, लघू व मध्यम व्यापारी व जनतेचे हित आणि सुरक्षिततेची भावना लक्षात घेता रात्रीच्या लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात आला. रोज कोविडच्या हजारो चाचण्या होत आहेत. भाजपशासित राज्यात चाचण्या नगण्य आहेत. विरोधक मात्र मानवी जीवाच्या विषयावर राजकारण करीत असून लोक मरताहेत तर मरू द्या, या भूमिकेत असल्याचा, घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

मंगळवारी सकाळी ११ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश महासचिव जिया पटेल, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मनोज बागडे, प्रशांत देशकर, धनराज साठवणे, अजय गडकरी आदी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांचे शेकडो पोती धान मिलिंगच्या प्रतीक्षेत आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रेशरमुळे धानाचे मिलिंग करता आले नाही. आताही अनेक शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. धानाची उचल करण्यासाठी मुदतवाढ संदर्भात मागणी केली आहे. तांदळाच्या उतारासंदर्भातही केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घोषित करण्यात आलेला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस एप्रिलमध्ये देण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राज्यात कर्मचारी पद भरती संदर्भातही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडी सरकारचे काम ऑलबेल सुरू आहे, मात्र विरोधक नाहक आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गतवर्षी घोषित करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. कुणाच्याही खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. फक्त घोषणा व जुमलेबाजी देऊन वेळ मारून नेण्यात आल्याचा टोलाही पटोले यांनी लगावला. दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात जो कोणी अधिकारी दोषी असेल त्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

बॉक्स

मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही

वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता नाना पटोले म्हणाले, वीज ग्राहकांना कुठलीही सुविधा व त्रास निर्माण होता कामा नये, या मताचे आम्ही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजेच्या देयकाचा भरणा केल्यास त्यापोटी वीज वितरण कंपनीला तोटा कमी प्रमाणात सहन करावा लागेल. मात्र आपण ऊर्जा खात्याच्या संदर्भात मंत्रिपदाच्या कुठल्याही शर्यतीत नाही. मी स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्याने केव्हाही मंत्रिपद मला मिळू शकते, मात्र आपण त्या संदर्भात कुठलाही विचार केलेला नाही किंवा आपण कुठल्याही शर्यतीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.