शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

ना मिळाला बोनस, ना विकले धान, शेतकरी झाला परेशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

शेंडा-कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था डोंगरगाव अंतर्गत येणाऱ्या कोयलारी (मसरामटोला) येथील धान खरेदी ...

शेंडा-कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था डोंगरगाव अंतर्गत येणाऱ्या कोयलारी (मसरामटोला) येथील धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान विकले होते. शासनाने धानाला ७०० रुपये प्रती क्विंटल बोनस देण्याचे जाहीर केले होते. त्या बोनसची रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही. तर रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी सातबारा ऑनलाईन केला. मात्र, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाने आजही धान घरीच पडून आहे. अशात आमचा वाली कोण? असा सवाल शेतकरी करीत आहेत.

खरीप हंगामातील धानाच्या बोनसची रक्कम एप्रिलमध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र, जून महिना लोटत आला असूनही बोनसच्या रकमेचा पत्ताच नाही. परिणामी शेतकरी चारही बाजूने हतबल झाला आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील धान खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे धान घरीच पडून आहे. काही शेतकऱ्यांना तर गरजेपोटी अत्यल्प दरात धान विकावे लागले. ही वस्तुस्थिती आहे. निवडणूक काळात सर्वच पक्षाचे नेते म्हणतात, मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. असे म्हटल्यावर भोळाभाबळा शेतकरी नेत्यांच्या भाषणावर विश्वास ठेवून मतदान करतो. आता मात्र नेत्यांची भाषा शेतकऱ्यांना चांगलीच समजली आहे. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी व वस्तुस्थिती बघण्यासाठी या परिसरात एकही नेता फिरकत नसल्याचे चित्र आहे. येथील राणी दुर्गावती चौकात दररोज सकाळी पाच पंचवीस शेतकरी जमा होऊन एकमेकांना विचारतात की, धान खरेदीचा तिढा सुटला का? कोणी म्हणतो, बोनस तरी मिळाला असता तर पेरणीसाठी बी-बियाणे, खतपाणी खरेदी केले असते. एकंदरीत चारही बाजूने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

२० हजार क्विंटल धान घरीच पडून

कोयलारी (हसरामटोला) संस्थेने धान खरेदीसाठी नव्याने सिमेंट ओटे तयार केले. संस्थेकडे धानाच्या सुरक्षिततेसाठी भक्कम ताडपत्र्या उपलब्ध आहेत. परंतु, उघड्यावर धान खरेदी करू नये, असे वरिष्ठांचे आदेश असल्याने या संस्थेची खरेदी थंड बस्त्यात आहे. याच धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाईन करून ठेवला. त्यानुसार खरेदीचे उद्दिष्ट २५ हजार क्विंटल आहे. गावातील आश्रमशाळा व शासकीय सभागृहात फक्त पाच हजार क्विंटल धान साठवून ठेवता येऊ शकते. उरलेले २० हजार क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरीच पडून आहे.

ओट्यावर धान खरेदीची परवानगी द्या

शासनाने संस्थेच्या सिमेंट ओट्यावर धान खरेदी करण्याची परवानगी देेणे अत्यावश्यक आहे. या अगोदर धानाची खरेदी जमिनीवर होत होती. त्यामुळे धान साठवण्याची समस्याच उद्‌भवली नव्हती. परंतु, यावर्षी उघड्यावर धान खरेदी करण्याचे आदेश नसल्याने शेतकऱ्यांची फजिती झाली आहे. शासनाने खरीप हंगामातील बोनस व सिमेंट ओट्यावर धान खरेदीचे आदेश त्वरित द्यावे, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.