शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पालांदूर येथे रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

पालांदूर : कोरोना संकटाने क्रिकेट स्पर्धेसह इतरही मैदानी खेळ प्रभावित झाले असताना पालांदूर येथे तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागाने रात्रकालीन ...

पालांदूर : कोरोना संकटाने क्रिकेट स्पर्धेसह इतरही मैदानी खेळ प्रभावित झाले असताना पालांदूर येथे तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागाने रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट सामने उत्साही वातावरणात गोविंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडले. नऊ दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेत प्रथम बक्षिसाचा मानकरी गुरढा येथील क्रिकेट संघ ठरला आहे. द्वितीय अड्याळ संघाला मिळालेला आहे. इतर बक्षिसामध्ये मॅन ऑफ द सिरीज ईश्वर साखरकर गुरढा, मॅन ऑफ द मॅच चेतन इसापुरे अड्याळ यांनी जिंकला. बक्षीस वितरण सरपंच पंकज रामटेके, उपसरपंच स्वप्निल खंडाईत (कवलेवाडा) यांच्या उपस्थितीत पार पडले. रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट सामन्यात एकूण ५५ संघांनी हजेरी लावली. क्रिकेट सामने नऊ दिवस चालले. थंडीतही तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग क्रिकेट सामन्यात अनुभवायला मिळाला. भंडारा जिल्ह्यासह शेजारच्या इतरही जिल्ह्यांतून क्रिकेट संघाने हजेरी लावली होती.

बऱ्याच वर्षांनंतर पालांदूर येथे क्रिकेट सामने खेळण्यात आले. मैदानाची कमतरता असल्याने तरुणाईचा क्रिकेट खेळण्याकरिता हिरमोड होत आहे. पालांदूर येथे गोविंद विद्यालयाचे, पोलीस ठाण्याचे मैदान तरुणांना आकर्षित करीत आहे. या मैदानांना आणखी सेवा पुरवीत सुसज्ज करण्याची गरज आहे.

राज्य सरकारने जिल्ह्यातील दुरवस्थेत असलेले क्रीडांगण दुरुस्त करण्याकडे लक्ष पुरविणे नितांत गरजेचे झाले आहे. तरुणाई मोबाईलच्या जमान्यात मातीतील खेळाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांना आपल्या मूळ मातीशी एकनिष्ठ ठेवण्याकरिता जुने असलेले क्रीडांगण नव्याने अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरवीत सुसज्ज करणे काळाची गरज झालेली आहे.

क्रिकेट सामन्याला श्याम चौधरी, अली मोहम्मद लद्दानी, विक्की यावलकर, सागर बोरकर, उमंग गायधनी, नितीन धकाते, आशिष सेलोटे, उमेर लद्यानी, पिंटू खंडाईत, पंकज रामटेके, अविनाश बावणे, अमोल पडोळे, सागर वंजारी, शुभम प्रधान, दिनेश तिजारे, अंकित राऊत ,देवेश नवखरे, नीरज किदरले, देवानंद लांजेवार, अनुप खंडाईत, वसंता धकाते, आदी पीएमसीएल क्रिकेट मंडळाच्या तरुणांनी सहकार्य केले.

फोटो