शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

न्यु इंडिया इंशुरन्सला ३४ हजारांचा दंड

By admin | Updated: August 1, 2014 00:08 IST

मोहाडी तालुक्यातील वरठी येथील कृपाशंकर पांडे यांनी गाडी घेतली होती. तिला अपघात झाल्याने त्याचा दावा देण्यास न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीने व बँक आॅफ इंडियाने टाळाटाळ केली.

ग्राहक मंचचा निर्णय : बँक व्यवस्थापकालाही ठोठावला दंड भंडारा : मोहाडी तालुक्यातील वरठी येथील कृपाशंकर पांडे यांनी गाडी घेतली होती. तिला अपघात झाल्याने त्याचा दावा देण्यास न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीने व बँक आॅफ इंडियाने टाळाटाळ केली. तर बँक आॅफ इंडियाने धनादेश अनादर झाल्याची बाब पुढे केल्याने या प्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सर्व पुरावे तपासल्यानंतर विमा कंपनी तथा बँकेला नुकसान भरपाई म्हणून दंड सुनावला आहे. ग्राहक मंचने दिलेल्या या निर्णयाने विमा कंपनीमध्ये खळबळ उडाली आहे. वरठी येथील सनफ्लॅग वसाहतीत राहणारे कृपाशंकर उर्फ शालीकराम पांडे यांनी मे. आॅटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर प्रा.लि. नागपूर येथून २०१० मध्ये एम.एच. ३६ एच १०७४ क्रमांकाची नवीन अल्टो कार विकत घेतली होती. या गाडीचा त्यांनी न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनी नागपूर विमा केला होता. विम्याच्या रकमेसाठी त्यांनी बँक आॅफ इंडिया वरठी शाखेचा १९५९१ क्रमांकाचा ६ हजार ३९६ रुपयाचा धनादेश विमा कंपनीला दिला होता. २ फरवरी २०१२ ला सदर गाडीला धडक दिल्याने तिचे नुकसान झाले होते. त्यानंतर ती गाडी शोरूमला जमा करून तिचे नुकसानभरपाईचा दावा व गाडीचे नुकसान दुरुस्ती करण्यात आली. यासाठी कंपनीने वेळकाढूपणा करत पांडे यांना गाडी वेळेत दिली नाही. याबाबत त्यांनी कंपनीला विचारणा केली असता त्यांनी इंशुरन्स कंपनीला दिलेला धनादेश अनादर झाल्याने गाडीचा विमा नसल्याची माहिती दिली. यावरून पांडे यांनी बँक व इंशुरंस कंपनीकडे विचारणा करून बँकेत पैसे असल्याचे पुरावे सादर केले. मात्र बँक आॅफ इंडियाचे तत्कालीन व्यवस्थापक यांनी पांडे यांच्या खात्यातून रक्कम वटविण्याऐवजी त्यांनी चुकीच्या व्यक्तीच्या खात्यातील रक्कम वळविली. चुकीचा खाता क्रमांक टाकल्याने इंशुरन्स कंपनीकडे पाठविला धनादेश वटला नाही. याचा फटका पांडे यांना बसला. दरम्यान पांडे यांना गाडीच्या नुकसानभरपाईसाठी कंपनीकडे ३४ हजार रुपये भरावे लागले त्रास सहन करावा लागला. याबाबत त्यांनी भंडारा येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे तक्रार दाखल केली. यात त्यांनी ६० हजार रुपयाची नुकसानभरपाई मिळावी असा दावा इंशूरन्स कंपनी व बँकेविरुद्ध केला. याबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी प्रकरणाची सर्व कागदपत्रे व पुरावे तपासली. त्यानंतर यात न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनी व बँक आॅफ इंडिया दोषी असल्याचा ठपका ठेवला. तक्रारकर्ते पांडे यांना अपघातविम्याचे ३४ हजार रुपये हे ७ टक्के दराने व्याजासह तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून देण्याचा आदेश दिला. बँकेला पांडे यांना मानसिक त्रास दिल्याप्रकरणी १० हजार रुपये व खर्चापोटी ५ हजार रुपये ३० दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिला. यावेळी मंचच्या सदस्या गीता बडवाईक, हेमंतकुमार पटेरिया यांनी यात महत्वाची भूमिका वटविली. तक्रारकर्ते पांडे यांच्याकडून अ‍ॅड.यु.बी. तिडके यांनी बाजू मांडली. (शहर प्रतिनिधी)