शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरचा नवीन सिमेंट रस्ता बनला पार्र्किं ग झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:48 IST

शहरातील नवीन सिमेंट रस्ता आता वाहनांसाठी पार्र्किंग झोन झाला आहे. आंतरराजीय या सिमेंट रस्त्यावर मन मानेल त्या पध्दतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंढी होवून अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसमस्येत भर : वाहनांमुळे अपघाताची शक्यता बळावली

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरातील नवीन सिमेंट रस्ता आता वाहनांसाठी पार्र्किंग झोन झाला आहे. आंतरराजीय या सिमेंट रस्त्यावर मन मानेल त्या पध्दतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंढी होवून अपघाताची भीती निर्माण झाली आहे.तुमसर शहरातील श्रीराम नगरातून जाणारा आंतरराज्यीय रस्ता आणि भंडारा मार्गावर सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. एका बाजुला रस्ता पूर्णत्वाचा मार्गावर आहे. सदर सिमेंट रस्ता सध्या चारचाकी वाहनांचे पार्र्किंग स्थळ झाले आहे. थेट रस्त्यावर वाहने उभी केली जात आहे. एकेरी मार्गावर वाहतूक कोंढी होवू नये म्हणून येथे तात्पूरती वाहतूक सिमेंट रस्त्यावर करण्यात आली आहे. रेल्वे फाटकापासून गभने सभागृहापर्यंत ८०० मिटर लांबीचा दुहेरी मार्गाचे सिमेंटीकरण सुरु आहे. सुमारे चार कोटी किंमतीचा हा मुख्य रस्ता आहे. येथे डाव्या बाजूचे सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.उजव्या बाजूच्या रस्त्यावर वाहतूक कोंढी होवून नये म्हणून डाव्या बाजूचा सिमेंट रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. या नविन सिमेंट रस्त्यावर चारचाकी वाहने सर्रास उभी केली जात आहे. दूचाकी व चारचाकी हलक्या वाहनांकरिता मोकळा केला होता. त्याचा फायदा वाहने उभी करण्यासाठी होत आहे. त्यामुळे दुसऱ्या एकेरी मार्गावर वाहतूकीची कोंढी होत आहे.येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. वाहतुक नियंत्रक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. शहरात अधिकारी वर्ग वास्तव्याला राहतो. याच मार्गाने त्यांचे ये-जा सुरु आहे. परंतु कुणीही दखल घेत नाही. दिवाळीत या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती.शहरात प्रवेश करणारा हा मुख्य रस्ता आहे. आंतरराज्यीय कटंगी, शिवनी रस्ता येथूनच जातो. जड ट्रक याच मार्गाने धावतात. सिमेंट रस्ता बांधकामामुळे एका पर्यायी रस्त्यावर वाहनाची मोठी गर्दी होते. अर्धे तुमसर शहर याच मार्गावर वसले आहे.एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहने सध्या सिमेंट रस्त्यावर पार्र्किं ग केले जात आहे. नगर परिषदच्या जलवाहिनीचे काम सध्या सुरु आहे. तांत्रिक कारणामुळे सिमेंट रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही.सिमेंट रस्त्याचे काम बंदसिमेंट रस्त्याचे कामे सध्या बंद आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी कामे सुरु होणार होती. पंरतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. येथे नवीन अभियंते रुजू झाले आहे. सदर रस्ता मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. या सर्व प्रकारामुळे अपघाताची शक्यता वाढली असून प्रवाशांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.