शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

महिला सशक्तीकरणासाठी समीक्षा आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 20:27 IST

महिला सशक्तीकरणासाठी समकालीन राजकारण, मुद्दे धर्म आणि आव्हाने यावर समीक्षा होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध समाज कार्यकर्त्या छाया खोब्रागडे यांनी केले.

ठळक मुद्देछाया खोब्रागडे : पटेल महाविद्यालयात चर्चासत्र

आॅनलाईन लोकमतभंडारा : महिला सशक्तीकरणासाठी समकालीन राजकारण, मुद्दे धर्म आणि आव्हाने यावर समीक्षा होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध समाज कार्यकर्त्या छाया खोब्रागडे यांनी केले. महिला अध्ययन केंद्र व ‘इप्रा’च्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जे.एम पटेल महाविद्यालयात आयोजित केलेल्या चर्चासत्रात उद्घाटक तथा स्त्री सशक्तीकरणातील राजकारणाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.अन्य महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक व एनजीओच्या सदस्यांसमोर त्या म्हणाल्या की, स्त्रियांच्या सशक्तीकरणातून राजकारण करताना त्यांतून दलित, आदिवासी किंवा ओबीसी यासारख्या वंचित घटकांतील स्त्रियांच्या समस्या व त्यांच्या अधिकारांचे मुद्दे परिघाबाहेर फेकले जातात. परंतु त्याच वेळेस या देशात याच दलित व आदिवासी स्त्रीयांमुळे स्त्री चळवळ मात्र जिवंत आहे, असे असले तरीही स्त्रियांच्या शोषणाचा व अत्याचारांचा अंत जवळ दिसत नाही. दिवसेंदिवस संपूर्ण देशात मूलतत्ववादी शक्ती डोके बाहेर काढून स्त्रियांच्या सशक्तीकरणालाच आव्हान देताना दिसत आहेत. समग्र स्त्रियांची चळवळ उभी राहिली नाही तर महत्प्रयासाने प्राप्त केलेले अधिकार स्त्रियांसाठी निरर्थक ठरतील.उद्घाटन प्रसंगी अतिथी म्हणून बोलताना नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे सहप्राध्यापक व इप्राचे सचिव डॉ. विकास जांभूळकर यांनी ज्ञानाच्या निर्मितीचे राजकारण विषद केले.धर्म, संस्कृती आणि राजकारण यांच्या संयोगातून स्त्रियांच्या शोषणाचे समर्थन करणारे ज्ञान निर्माण करून ते सामान्य लोकांवर थोपविले जाते. या ज्ञान-निर्मिती प्रक्रियेची समीक्षा आपण करीत नसल्यामुळे स्त्रियांच्या सशक्तीकरणाच्या समस्येच्या मुळापर्यंत आपण जात नाहीहीच खरी समस्या आहे. या राजकारणाला उघड केल्याशिवाय स्त्रियांचे संघर्ष यशस्वी होणार नाहीत. प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी अध्यक्षीय भाषणात, देशातील कर्तुत्ववान स्त्रियांच्या उदाहरणांतून त्यांच्या उज्वल भविष्याची ग्वाही दिली. या चर्चासत्राचे प्रास्ताविक करताना स्त्री अध्ययन केंद्राचे आणि या चर्चासत्राचे समन्वयक डॉ. प्रदीप मेश्राम यांनी स्त्री सशक्तीकरण व सक्षमीकरण यांतील भेद करताना छद्म-स्त्रीवादाची समीक्षा केली. या देशांत जाती-वर्ग निहाय स्त्रियांच्या समस्या व वंचनेत असलेले भेद भिन्न स्त्रीवादाची निर्मिती करतात आणि वास्तविक समस्यांना अधिक जोरकसपणे अधोरेखित करतात. या चर्चासत्राचे सह-समन्वयक प्रा.डॉ. कार्तिक पणिक्कर यांनी उद्घाटन सत्राचे आभार व्यक्त केले. या चर्चासत्राच्या प्रथम सत्रात धम्मसंगिनी रमागोरख, ज्योती निस्वाडे आणि पद्मा उईके यांनीही मत व्यक्त केले. अध्यक्षस्थान डॉ. अशोक बोरकर यांनी भूषविले.धम्मसंगिनी रमागोरख यांनी युनो च्या दबावातून या देशात निर्माण केलेल्या कायद्यांचा आढावा घेतला तर पद्मा उईके यांनी आदिवासी समाजाचे स्त्रोत हिसकावून घेतल्यामुळे त्यांचा स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थितीवर घडून आलेल्या विपरीत परिणामांची समीक्षा केली. ज्योती निसवाडे यांनी शहरी स्त्रियांच्या सक्षमीकरणांतील आव्हानांची चर्चा केली. डॉ. बोरकर यांनी स्त्री सशक्तीकरणाकडे नवीन समग्र दृष्टीकोनातून बघण्याची गरज विशद केली.दुसऱ्या सत्रात मुकेश शेंडे यांनी आदिवासी स्त्रियांच्या वंचीततेकडे लक्ष वेधताना त्यांच्या लढ्यांना शासन कसे दडपते हे विषद केले. पवन साटकर यांनी शिक्षण व्यवस्था पुरुष सत्ताकतेचे करीत असलेल्या राजकारणाची समीक्षा केली. प्रवीण थोटे यांनी चित्रपटांतील लोकप्रिय गाणी अश्लीलता पसरविताना स्त्रियांच्या विरोधातील हिंसेला उत्तेजन देतात याची उत्कृष्ट मांडणी केली. या प्रसंगी सुरज पवार यांनी दोन लघु चित्रपट दाखवून त्यांचे विश्लेषण प्रस्तुत केले. या चर्चासत्राच्या संचालनाची जबाबदारी शिवानी वालदेकर, सुधा कडव, किरण राघोर्ते, फिरोझा शेख व अर्चना धोत्रे यांनी संभाळली. आभार प्रा. ममता राऊत यांनी मानले. चर्चासत्रासाठी कार्यक्रमाच्या सहसमन्वयक प्रा. ममता राऊत, डॉ. उज्वला वंजारी, डॉ. विनी ढोमणे, डॉ. उमेश बन्सोड, प्रा. शेष, प्रा. अधिकारी आदींनी सहकार्य केले.