शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्य काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:56 IST

स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास होणे अशक्य बाब आहे. परिणामी स्वतंत्र विदर्भराज्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे असून ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देश्रीहरी अणे : भंडाऱ्यात विदर्भ राज्य आघाडीचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास होणे अशक्य बाब आहे. परिणामी स्वतंत्र विदर्भराज्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे असून ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.विराच्या भंडारा जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बार अशोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास भुरे होते. अतिथी म्हणून विराचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. निरज खांदेवाले, भंडाराचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णीकर, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष छैलबिहारी अग्रवाल, अक्षय पांडे, गुरमित चावला आदी उपस्थित होते.अ‍ॅड. टेंभुर्णीकर म्हणाले, विदर्भ स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी विराचे योगदान व भरारी महत्वाची आहे. या आंदोलनात अन्य क्षेत्रातील मंडळीसोबतच वकीलांचाही सहभाग असल्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा मागणीसाठी जनआंदोलनाला निश्चित दिशा प्राप्त झाली आहे. जिल्हा कार्यालयाच्या स्थापनेमुळे कार्यकर्त्यांना एक नविन उर्जा प्राप्त होणार आहे.यावेळी उपस्थित अतिथींनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शासन केवळ घोषणाबाजी करीत आहे. अच्छे दिनाचा लॉलीपॉप जनतेला दाखविला जात आहे. पेट्रोलचे दर ६० रुपयांवरुन ८० रुपये झाले आहे. गॅस सिलिंडरचे दर ही सातत्याने वाढत आहेत. कैलास भुरे म्हणाले, तथागत गौतमबुध्दाच्या जयंतीदिनी विराच्या कार्यालयाचे उद्घाटन होणे ही निश्चितच यशस्वीकडे वाटचाल करण्याची चिन्हे आहेत. यावेळी छैलबिहारी अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला लाखांदूरचे तालुका अध्यक्ष दिगांबर मेश्राम, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य दुर्वास धार्मिक, संजय मते, सुका देशकर, यादव चौबे, शेख इब्राहिम, अजय मेश्राम, कैलास टेंभुर्णे, परिका रामटेके, योगेश्वरी कोचे, ज्वाला कोचे, उन्नती कटकवार, दामिनी चुधरी आदी उपस्थित होते. संचालन व आभार महिला आघाडीच्या संघटन सचिव परिका रामटेके यांनी केले.