शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामासाठी राष्ट्रवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:04 IST

येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकातील रस्त्याचे काम गत १५ दिवसांपासून बंद पडले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी नेते पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक रस्त्याचे बांधकाम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकातील रस्त्याचे काम गत १५ दिवसांपासून बंद पडले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी नेते पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद चौक-राजीव गांधी चौक-खात रोडपर्यंत रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा परिषद चौकातून महिनाभरापूर्वी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. परंतु १५ दिवसांपूर्वी नगरपरिषदेने महामार्ग प्रशासनाला पत्र दिले. त्यामुळे काम ठप्प झाले आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा असते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ काम सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी दुपारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. साईमंदिरापासून निघालेल्या या मोर्चातील नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. जिल्हा कचेरीवर हा मोर्चा पोहचल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु झाले नाही तर भंडारा बंदचा इशाराही देण्यात आला.या मोर्चात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, अ‍ॅड.जयंत वैरागडे, अ‍ॅड.विनयमोहन पशिने, बाबूराव बागडे, परवेज पटेल, जुगल भोंगाडे, नगरसेवक उमेश ठाकरे, नगरसेविका अश्विनी बुरडे, नगरसेवक अमर उजवणे, मधुकर चौधरी, सुनील साखरकर, शुभांगी खोब्रागडे, लोकेश खोब्रागडे, रामदास शहारे, नरेंद्र झंझाड, राजू हाजी सलाम, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, सेवादल जिल्हाध्यक्ष सुनील शहारे, प्राध्यापक राजपूत, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र वानखेडे, सुमीत घोगरे, विजय खेडीकर, सरिता मदनकर, हर्षा वैद्य, रत्नमाला वैद्य, निलीमा गाढवे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.महामार्गावर रस्ता रोकोराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी काही काळ आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली.