शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला सक्रिय कार्यकर्त्यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:39 IST

कोणताही पक्ष हा नेत्यामुळे चालत नाही तर कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य दुवा असतो. नुसते कागदोपत्री पक्ष सदस्यांची नोंदणी न करता तनमनाने इच्छुक असणाऱ्यांना पक्षाशी जोडून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून संघटनात्मक बांधणीच्या कामाला लागा.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : लाखांदूर येथे साकोली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता बैठक

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : कोणताही पक्ष हा नेत्यामुळे चालत नाही तर कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य दुवा असतो. नुसते कागदोपत्री पक्ष सदस्यांची नोंदणी न करता तनमनाने इच्छुक असणाऱ्यांना पक्षाशी जोडून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून संघटनात्मक बांधणीच्या कामाला लागा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सक्रिय कार्यकर्त्यांची गरज असून प्रत्येक कार्यकर्ता हा क्रियाशील असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.लाखांदूर येथे शनिवारला आयोजित साकोली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, अनिल बावनकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, धनंजय दलाल, डॉ.विकास गभने, बालु चुन्ने, लता परसगडे, विजय शिवनकर, रेखा ठाकरे, कांता मेश्राम, कल्पना जाधव, कल्याणी भुरे, तोमेश्वर पंचभाई, उर्मिला आगासे, अंगराज समरीत उपस्थित होते.यावेळी खा.पटेल म्हणाले, मागील काळात या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. येथील शेतकरी व शेतमजुरांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मात्र मागे वळून पाहिले असता एकटाच होतो. अशी वेळ पुन्हा यायला नको. आता प्रत्येक कार्यकर्त्यांने पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले पाहिजे. ज्यांना पक्षात काम करायचे नसेल त्यांनी आताच सांगा, कुणावरही कुठलिही जबरदस्ती नाही, असा दमही दिला.दरम्यान धनराज हटवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला. प्रास्ताविक जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले. आभारप्रदर्शन शिलमंजु सिंव्हगडे यांनी केले. कार्यक्रमासाठी देवानंद नागदेवे, विनोद ढोरे, दीपक चिमनकर, वैशाली हटवार, दिनेश कुडेगावे, धनराज ढोरे, देविदास राऊत, दुर्गेश कांबळे, प्रियंक बोरकर, अ‍ॅड. मोहन राऊत, प्रशांत हटवार, जितु सुखदेवे, चंद्रशेखर खेडीकर, नरेश दिवटे यांनी सहकार्य केले.