शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नायब तहसीलदारांचे पद रिक्त

By admin | Updated: June 3, 2014 23:53 IST

लहान राज्यांची कल्पना साकारुन विकास नजरेसमोर ठेवून लाखनी तालुका तयार करण्यात आला. मात्र निर्धारित कर्मचारीगण, स्वतंत्र इमारत, खर्चाची तरतूद शासनाने न केल्याने लाखनी तहसील

अनुशेष कायम : तहसीलदारांवर कामाचा ताण, लाखनी तालुक्यातील प्रकारपालांदूर :  लहान राज्यांची कल्पना साकारुन विकास नजरेसमोर ठेवून लाखनी तालुका तयार करण्यात आला. मात्र निर्धारित कर्मचारीगण, स्वतंत्र इमारत, खर्चाची तरतूद शासनाने न केल्याने लाखनी तहसील कार्यालय संकटात आले आहे.  कर्मचार्‍याचा वाणवा अधिकच वाढल्याने जनतेची कामे रेंगाळत आहेत.लाखनी तालुक्याला बारा वर्षे होऊनही  शासकीय नियमानुसार कर्मचारीगण उपलब्ध नसल्याने जनतेला वारंवार तहसील कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागतात. हल्ली नायब तहसीलदाराची एकही जागा भरली नसल्याने कामाचा खोळंबा झाला आहे. निवडणूक विभाग, संजय गांधी-इंदिरा गांधी, वयोवृद्ध पेन्शनरला दरमहा दोन कोटीचे वाटप केल्या जाते. पण या टेबलला एकही कर्मचारी गण नसल्याने कामावरील कर्मचार्‍यांना कामाचा ताण वाढतच असल्याचे दृश्य आहे.संगणकाच्या दुनियेत आपण शिरकाव केला असला तरी शासनाच्या उदासीन धोरणाने लाखनी तहसील कार्यालयाला संगणक मिळालाच नसून कार्यालयीन खर्चाची तरतूदसुद्धा नसल्याने प्रशासन चालवायला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे तहसीलदार सर्मथ यांनी पालांदूर भेटीत लोकमतकडे व्यक्त केले.जनतेचे सेवा करण्याची मनोमन इच्छा आहे, पण कामाचा व्यापच अधिक असल्याने जनतेला त्रास सहन करावाच लागतो. तरीपण शक्य तितक्या प्रयत्नांनी गारपीटग्रस्तांना अतवृष्टीग्रस्तांना मदत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.गारपीटग्रस्त २८ गावांना ३४३२ लाभार्थ्यांंना ६८,३२,७४0 रुपयाचे एनएफटीच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. शेतीच्या नुकसानीत ३९ गावात ४२५८ शेतकर्‍यांना ३ कोटी २२ लक्षाचे एनएफटीच्याद्वारे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. मागील खरिपात आलेल्या अतवृष्टीचे ४ कोटी ६0 लाख वाटप झाले असून खाते क्रमांकाच्या चुकीने  वाटप रेंगाळले असून वाटप सुरूच असल्याचे तहसीलदार सर्मथ यांनी सहजरीत्या कामात दिरंगाई नसल्याचे स्पष्ट केले. लाखनी तहसील कार्यालयाची  इमारत सज्ज आहे, परंतु प्रवेशाचा मुहूर्त राजकारणात अडकला आहे. परिणामी कार्यालय जसे आहे तिथेच त्याच स्थितीत चालवत आहोत.  जनतेची मागणी रेटून धरुन  शासनाला गळ घातली, तर बरे होईल, अशी आर्त अपेक्षा सर्मथ यांनी बोलून दाखविली आहे. लोकप्रतिनिधींनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासात्मक बाजूने विचार करुन लाखनी तालुक्याला कामानुसार कर्मचारीगण उपलब्ध करुन द्यावे व नियोजित इमारतीत कार्यालय त्वरित नेण्यात यावे, अशी लाखनी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)