शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कुर्झा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

By admin | Updated: January 8, 2017 00:32 IST

येथील एल.डी. बलखंडे कॉलेज आॅफ आॅर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स यांचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कुर्झा येथे स्वच्छ भारताकरिता युवा शक्ती या संकल्पनेवर आधारित शिबिर घेण्यात आले.

बलखंडे महाविद्यालयाचा उपक्रम : निर्मलग्राम योजना राबवून आदर्श गाव बनविण्याचे आवाहनपवनी : येथील एल.डी. बलखंडे कॉलेज आॅफ आॅर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स यांचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कुर्झा येथे स्वच्छ भारताकरिता युवा शक्ती या संकल्पनेवर आधारित शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शंकर फुंडे, उपसरपंच गोपीचंद दंडारे, उपसभापती अल्का फुंडे, प्राचार्य डॉ.जयकिशन संतोषी, रासेयो अधिकारी प्रा.एम.पी. सिंगाडे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.मंगेश वाहाणे उपस्थित होते. यावेळी तोमेश्वर पंचभाई म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावाचा विकास, ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम योजना राबवून आदर्श गाव बनवा असे आवाहन केले. सरपंच शंकर फुंडे म्हणाले, गावाला आदर्श बनविण्याकरिता विविध योजनांची सुरुवात करून गाव विकासाचे कार्य करण्याचे आवाहन केले.या शिबिरात ग्रामसफाई, नाल्यांची सफाई, गाजर गवत निर्मूलन, शौच खड्डे तयार रणे, कच्च्या नालीचे बांधकाम करणे, विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान व मानव आरोग्य यावर श्रीकांत शहारे व शाहीद अली, रस्ते वाहतूक व अपघात यावर सचिन गदादे पी.एस.आय. व सुहास चौधरी ए.पी.आय., नेत्र चिकित्सा शिबिर घेऊन ७६ रुग्णांची तपासणी करण्यात येवून औषधी वितरीत केली. व्यसनमुक्ती व मधुमेह या विषयावर डॉ.जी.एम. नंदागवळी, डॉ.आशिष मोहरकर, डॉ.अखिलेश कांबळे, डॉ.अश्विन गोटाफोडे यांनी मार्गदर्शन केले. वृक्ष संवर्धन विषयावर बागडे गुरुजी यांनी, सेंद्रीय शेती व जलव्यवस्थापन यावर दिलीप पाथोडे यांनी मार्गदर्शन केले.शिबिरात निर्मल स्वच्छग्राम, हुंडाबळी, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ बेटी पढाओ, इत्यादी सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक, पथनाट्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संतोषी होते. अतिथी म्हणून सरपंच शंकर फुंडे, जयप्रकाश गजभिये, अल्का फुंडे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.एन.पी. सिंगाडे यांनी केले.संचालन प्रा.विलास मेश्राम तर आभारप्रदर्शन प्रा.मंगेश वाहाणे यांनी केले. शिबिरासाठी प्रा.नाना जाधव, प्रा.शरद गजभिये, सुप्रिया चिंतनवार, रासेयो प्रतिनिधी श्रेखा खापर्डे, मयुरी पाटील, माधुरी पंचभाई, शुभांगी खांदाडे, सचिन सावरबांधे, अजिभीत जनबंधू, किरण गजभिये यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)