शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय आरोग्य मिशनचा जनसंवाद

By admin | Updated: January 25, 2015 23:09 IST

राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवावर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रकल्पाचा एक भाग भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील पंचायत समिती सभागृहात जनसंवाद साधी

तुमसर : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवावर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रकल्पाचा एक भाग भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील पंचायत समिती सभागृहात जनसंवाद साधी पुणे च्या सहकार्याने ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडाराने आयोजित केले होते.जनसंवादाच्या पॅनेलमध्ये पुणे येथील साधी संस्थेच्या राज्य समन्वयक शकुंतला भालेराव व भाऊ अहेर, तुमसरच्या मीरा भट्ट, अमरावतीचे डॉ. राहुल बैस व भंडाराचे डॉ.एल.एम. चौधरी हे होते. आरोग्य सेवाबद्दल लाभार्थ्यांचे मत जाणून घेण्यासाठी तुमसरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कुरैशी, लेंडेझरी आरोग्य केंद्राचे मेडीकल आॅफीसर डॉ.लुंगे, चुल्हाडचे डॉ.शेंडे तसेच तुमसर तालुक्याचे आरोग्य विस्तार अधिकारी व्ही.टी. डोंगरे सहभागी झाले.जनसुनावणी मध्ये तुमसर तालुक्याच्या लेंडेझरी, गोबरवाही व चुल्हाड आरोग्य केंद्राच्या क्षेत्रामधील गावातील दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा मातामृत्यू, बालमृत्यू, आरोग्य सेवाची माहिती लोकापर्यंत पोहचविणे, लाभार्थ्यांचे समाधान असमाधान, ठोस माहितीच्या आधारे लोकांच्या समस्या कार्यक्रमात उपस्थित करण्यात आल्या. वरील परिस्थिती सुधारण्यासाठी आरोग्य हा विषय बनवावा, ठिकठिकाणचे आरोग्य प्रश्न वेशीवर टांगले जावेत तेव्हा सर्वांना आरोग्य सेवा हे प्रत्यक्षात येईल. लोकांनी जागृती, समीक्षा आणि संघर्ष करायला हवा अशी भूमिका पॅनलच्या प्रतिनिधींनी घेतली.प्रभावी मुद्यास घेऊन अधिकारी व लोकांमध् ये चर्चा घडवून तोडगा काढण्याच्या भूमिका निश्चित करण्यासाठी तालुकास्तरीय आठ लोकांचे प्रतिनिधी मंडळाची निश्चिती करण्यात आले. त्यांनी आमदारांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय यंत्रणेसोबत चर्चा करण्याचे ठरले. तसेच राज्यव्यापी प्रश्नांची पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच गावस्तरावर ग्राम आरोग्य स्वच्छता व पाणी पुरवठा समितींना सक्षम करण्याकरिता प्रशिक्षण आखणी करणे, योजनांची माहिती प्रसारण करण्याकरिता प्रत्येक गावात बॅनर लावून जागृती करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. कार्यक्रमाला तुमसर तालुक्यातील महिला, पुरुषांनी सहभाग घेतला. कश्मीर मेश्राम यांनी कार्यक्रमाचे संचालन, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव, अविल बोरकर यांनी आरोग्य प्रश्नाचे विश्लेषण मांडणी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यात योगेश टेंभरे, जगन्नाथ कटरे, वामन सिंगनजुडे यांनी मोलाचे सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)