शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षांत समारंभाच्या नावावर सावाळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:41 IST

दीक्षांत समारोहाच्या आयोजनाचे कारण पुढे करून एक अधिसूचना काढून २४ मार्चला होणाऱ्या ११८ परीक्षा पुढे ढकलण्याचे काम नागपूर विद्यापिठाने केले आहे. विद्यापिठाच्या या कारभाराचा फटका ६७० महाविद्यालयातील चार लाख ५० हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे.

ठळक मुद्देसिनेट सदस्य उदापुरेंचा आरोप : राज्यपालांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा

आॅनलाईन लोकमतभंडारा : दीक्षांत समारोहाच्या आयोजनाचे कारण पुढे करून एक अधिसूचना काढून २४ मार्चला होणाऱ्या ११८ परीक्षा पुढे ढकलण्याचे काम नागपूर विद्यापिठाने केले आहे. विद्यापिठाच्या या कारभाराचा फटका ६७० महाविद्यालयातील चार लाख ५० हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे. हे प्रकरण गंभीर असून विद्यार्थ्यांच्या हिताविरूद्ध आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाची तक्रार विद्यापिठाचे कुलपती तथा राज्यपाल यांच्याकडे करणार असल्याचे सिनेट सदस्य प्रविण उदापुरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.यावेळी उदापुरे म्हणाले, विद्यापीठ परीक्षेचे वेळापत्रक हे दोन महिन्यापूर्वीच ठरविले जाते. दिक्षांत समारंभ २४ मार्च रोजी आयोजित करण्यात आल्यामुळे ११८ परीक्षा ८ एप्रिल रोजी घेण्याची अधिसूचना २० मार्च रोजी काढण्यात आली.ही अधिसूचना नागपूर शहरातील वृत्तपत्रात आहे. सध्या विद्यार्थी परीक्षेत व्यस्त असल्यामुळे त्यांना ही अधिसुचना माहित नाही. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी संपूर्ण परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. विद्यापिठाने पुढे ढकललेल्या परीक्षा ८ एप्रिल रोजी होणार असून ज्यांनी त्यादिवशी इतर ठिकाणी जाण्याचा किंवा परीक्षेचा कार्यक्रम ठरविला असल्यास किंवा एखाद्या विद्यार्थ्याने न्यायालयात दाद मागितल्यास संपूर्ण विद्यापीठ प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.एकीकडे सेमेस्टर पॅटर्न हे विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे शैक्षणिक धोरण राबविले जात असून त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर प्रशासनावर ताण पडत आहे. एखादी राष्ट्रीय आपत्ती आल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गृह विभागाच्या सल्ल्यानुसार किंवा विशेष आणिबाणीची परिस्थिती उद्भवली तेव्हाच परीक्षा पुढे ढकलल्या जातात. परंतुविद्यापिठाने या परीक्षा पुढे ढकलून काय साध्य केले आहे हा संशोधनाचा विषय आहे.दिक्षांत समारंभ महत्वाचा की, परीक्षा हा प्रश्न निर्माण झाला. विद्यापिठावर निवडून आलेला लोकप्रतिनिधी या नात्याने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता २४ मार्च रोजी दिक्षांत समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याचा ईशाराही उदापुरे यांनी दिला आहे.