शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

नागझिरा नवेगावबांध अभयारण्याचे कार्यालय साकोली येथे करा

By admin | Updated: March 23, 2015 00:54 IST

नागझिरा, न्यू नागझिरा व नवेगावबांध अभयारण्याचे उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) कार्यालय गोंदिया येथून साकोली येथे स्थानांतरीत करण्यात यावे,

साकोली : नागझिरा, न्यू नागझिरा व नवेगावबांध अभयारण्याचे उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) कार्यालय गोंदिया येथून साकोली येथे स्थानांतरीत करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र दूरसंचार समितीचे सदस्य प्रभाकर सपाटे यांनी वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनातून केली आहे.नागझिरा, न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्प व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा कारभार गोंदिया येथील उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) यांच्या कार्यालयातून चालत आहे. या कार्यालयातून अभयारण्यातील कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. साकोली येथे नागझिरा व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान येथे सहाय्यक उपवनसंरक्षक यांचे कार्यालय आहे. वनक्षेत्राधिकारी वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांच्यावर साकोली व नवेगाव येथील कार्यालयातून नियंत्रण करण्यात येते.गोंदिया येथील कार्यालयात महिन्यातून आठ - दहा वेळा जावे लागते. त्यामुळे शासनालाच त्याच्या भत्त्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच गोंदिया येथील कार्यालयातून अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानातील चोऱ्या, शिकारी या घटनावर नियंत्रण ठेवणे अशक्य होत आहे. पर्यटकांना आरक्षण व नोंदणीसाठी गोंदिया येथे नेहमीच संपर्क करावा लागतो. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या घटत आहे. नागझिरा अभयारण्यातून गेल्या दहा ते पंधरा वर्षात कोट्यवधींची वनसंपदा नष्ट झाली आहे. अवैध शिकारीचे प्रकरण बरेच गाजले आहे. त्यामुळे सर्व कारभार साकोली येथून करण्यात यावा. साकोलीपासून नागझिरा १८ कि.मी. व न्यू नागझिरा १५ कि.मी. व नवेगावबांध ३० कि.मी. अंतरावर आहे. साकोली हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून नागपूर विमानतळ १०० कि.मी. व सौंदड रेल्वे स्टेशन १० कि.मी. अंतरावर आहे. पर्यटकांना उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) यांचे कार्यालय साकोली येथे मध्यस्थानी होईल व सोयीचे होईल. या कार्यालयासाठी साकोली येथे जागा पुरेशी असून मनुष्यबळही उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाचे अनावश्यक खर्च टाळावा व पर्यटकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी साकोली येथे उपवनसंरक्षक यांचे कार्यालय स्थानांतरीत करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी खा.नाना पटोले व आ.बाळा काशीवार यांनाही सपाटे यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)