लढा स्वतंत्र विदर्भासाठी : विदर्भ जार्इंट अॅक्शन कमिटीचा पुढाकारभंडारा : विदर्भ सर्वच दृष्टीने सक्षम असला तरी महाराष्ट्रात आहे. त्यामुळे विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. आतापर्यंत अन्याय सहन केला. यापुढे अन्याय सहन करणार नाही, आमचे शोषण होऊ देणार नाही, याकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जार्इंट अॅक्शन कमिटीने नागपूर ते दिल्ली असा पायदळ मार्च काढण्यात येत असल्याची माहिती या कमिटीचे संयोजक अहमद कादर, भोला बढेल, दिनदयाल नौकरीया, प्रभाकर कोंडबत्तुनवार यांनी आयोजित पत्रपरीषदेत दिली.यावेळी ते म्हणाले, ५ सप्टेंबर शिक्षक दिन ते २ आॅक्टोबर गांधी जयंती असा नागपूर ते दिल्ली कार्यक्रम आहे. सहा राज्यातून १४ जिल्ह्यातून होणारा हा प्रवास ३० दिवसात १,०५० कि.मी. अंतराचा आहे. गांधी जयंतीदिनी कमिटीच्यावतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी ते म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी हरीयाना, हिमाचल, गोवा आणि तेलंगना या राज्य निर्मितीच्या फार जुनी आहे. परंतु विदर्भाकडे दुर्लक्ष करुन नवनवीन राज्य उदयाला येत आहेत. नवीन राज्य निर्मिती करणे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. त्यामुळे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जार्इंट अॅक्शन कमिटीने पायदळ मार्च काढण्याचा पुढाकार घेतला आहे. स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यातील हे सर्वात मोठे आंदोलन राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)
नागपूर ते दिल्ली पायदळ मार्च
By admin | Updated: August 18, 2014 23:19 IST