शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेचे वाद येऊ लागले चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

तीन वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. बंडखोर गटाचे सर्वांत जास्त नगरसेवक ...

तीन वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. बंडखोर गटाचे सर्वांत जास्त नगरसेवक निवडून आले. त्यामुळे भाजप व काँग्रेसला अनुक्रमे दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. जेव्हा नगर पंचायतमध्ये सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा बंडखोर गटाने पुन्हा भाजपचा घरोबा केला. परंतु, नगर पंचायतची सत्ता सूत्रे किंगमेकर ठरलेल्या बांधकाम सभापती यांच्या हाती राहिली. तेव्हा त्यांच्याबद्दल काही जणांमध्ये द्वेषसुद्धा निर्माण झाला होता. आमच्या मर्जीने कामे व्हावीत, अशी इच्छा सहकारी सभापती यांच्यासह पक्षाचे व विरोधी पक्षाचे नेते आणि नगरसेवक बाळगत होते. परंतु, शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ही बाब येथे वेळोवेळी सिद्ध होत राहिली. कुणी कितीही तक्रार केली तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सभापतींनी आपल्या पद्धतीने नगर पंचायतचे कामकाज चालविण्याचे काम केले. त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशीसुद्धा समन्वय साधला नाही, असा आरोप भाजपचे पदाधिकारी करीत राहिले. मात्र, दोन महिला सभापतींनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बांधकाम सभापती आपल्या मर्जीप्रमाणे कारभार चालवित असून, निर्णय घेताना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत सभापतिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नगर पंचायतचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

आपल्या वाॅर्डातील नगरसेवकाकडे किंवा संबंधित सभापतीकडे नागरिक धाव घेत आपल्या समस्या मांडतात. मात्र, या समस्या मार्गी लावण्यासाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप सभापतींनी केला आहे. यामुळेच स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा सभापती दमयंता भूमेश्वर कोटांगले आणि महिला व बालकल्याण सभापती मंगला महेश चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावर अद्यापही कुठलाही विचार करण्यात आला नाही. मात्र, या प्रकारामुळे नगर पंचायतच्या विकासकामाला खीळ बसण्याची शक्यता आहे. आधीच अनेक बाबतीत विकासापासून कोसोदूर असलेल्या नगर पंचायतला खीळ बसण्याची शक्यता आहे.