शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त बालकांना ‘एमएसआयसी’ धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ६५१ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ३४१ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. एमएसआयसी आजार वय वर्ष ३ ते १२ या गटात होऊ शकतो. २४ तासांपेक्षा जास्तवेळ अंगात ताप असणे, बाळाला सुस्त वाटणे, शरीरावर लाल चट्टे येणे, डोळे लाल होणे, उलटी, मळमळ व हगवण लागणे, हृदयाची गती वाढणे,  श्वसन प्रक्रिया वेगात होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत.

ठळक मुद्देपालकांनो बालकांची काळजी घ्या : सतर्कता बाळगणे गरजेचे

इंद्रपाल कटकवार लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनानंतर विविध आजार डोके वर काढत आहेत. अशातच ‘एमएसआयसी’ म्हणजेच मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा बालकांमध्ये धोका बळावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना झालेल्या बालकांना पंधरा दिवस ते तीन महिन्यांच्या कालावधीत हा आजार उद्भवू शकतो. प्राथमिक लक्षणे ओळखून औषधोपचार केल्यास त्यावर सहजपणे मात करता येऊ शकते. जिल्ह्यात आतापर्यंत शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ६५१ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ३४१ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. एमएसआयसी आजार वय वर्ष ३ ते १२ या गटात होऊ शकतो. २४ तासांपेक्षा जास्तवेळ अंगात ताप असणे, बाळाला सुस्त वाटणे, शरीरावर लाल चट्टे येणे, डोळे लाल होणे, उलटी, मळमळ व हगवण लागणे, हृदयाची गती वाढणे,  श्वसन प्रक्रिया वेगात होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे आढळताच तत्काळ डॉक्टरांना दाखवून देणे अत्यंत आवश्यक आहे. 

जिल्ह्यात ६५१ बालकांना कोरोना जिल्ह्यात आतापर्यंत ० ते १० वयोगटातील ६५१ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन बालकांचा मृत्यू झाला, तर इतर बालके बरी होऊन घरी परतली. 

ही घ्या काळजी

२४ तासांपेक्षा जास्त ताप असणे, शरीर अस्वस्थ वाटणे, शरीरावर लाल चट्टे येणे, उलटी होणे, डोळे लाल होणे, हगवण, हृदयाची गती वाढणे अशी लक्षणे आढळतात. यावर वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक लक्षणे आढळली तरी स्वमताने बालकाला औषध देऊ नये. वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या बालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तो बरा झाला असेल तर त्यावर लक्ष देत राहावे. घाबरण्याचे कारण नाही. परंतु दक्ष असणे महत्त्वाचे आहे. दिरंगाई करणे म्हणजे बाळाला धोक्यात ठेवण्यासारखे आहे. याशिवाय आपल्या मनाने  बाळाला औषध देऊ नये. 

बालकाला कोरोना झाल्यानंतर पंधरा ते तीन महिन्यांपर्यंत एमएसआयसीचा धोका असू शकतो. घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. प्राथमिक लक्षणे लक्षात येताच वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. उगीच जोखीम पत्करण्यापेक्षा उपचार करणे कधीही चांगले असते.- डॉ. अमित कावळे, बालरोग तज्ज्ञ, भंडारा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या