शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

रास्ता रोको आंदोलनापुढे नमले प्रशासन

By admin | Updated: June 9, 2017 00:41 IST

लाखनी तालुक्यातील बोरगाव येथील शाळेच्या पटांगण सपाटीकरणावरून एक वर्षापूर्वी सपाटीकरण

अधिकाऱ्यांचे आश्वासन : प्रकरण बोरगाव येथील शाळा पटांगण सपाटीकरणाचेलोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव / लाखनी : लाखनी तालुक्यातील बोरगाव येथील शाळेच्या पटांगण सपाटीकरणावरून एक वर्षापूर्वी सपाटीकरण कामात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी अखेर शिवसेना कार्यकर्त्यांना रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. या आंदोलनापुढे प्रशासनाला नमावे लागले. दोषींकडून वसुली कार्यवाही करण्याचे आदेश काढून सदर प्रकरणाची माहिती व परवानगी करीता आदेश काढून तशी माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी यांना कळविण्यात आली. त्यामुळे बोरगावासी तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.बोरगाव येथील शाळेच्या मैदान मजुरांद्वारे करणे होते. मात्र येथील सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी संगनमत करून या कामावर बोगस मजूर दाखवून यंत्राच्या सहायाने काम केले. येथील सुज्ञ नागरिकांनी हे प्रकरण उचलून २६ जानेवारी २०१६ चे ग्रामसभेत विषय घेवून या कामावर झालेल्या गैरप्रकार प्रकरणी झालेला खर्च नामंजुर करण्यात आला. वारंवार पत्रव्यवहार करून चार सदस्यीय, तीन सदस्यीय समितीच्या माध्यमातून विभागीय चौकशी लावून १ लाख ४४ हजार ०४९ एवढी रक्कम या प्रकरणात दोषी असलेले तत्कालीन ग्रामसेविक, सरपंच व रोजगार सेवक यांचेकडून समप्रमाणात वसूल करण्यात यावे, असे २६ जानेवारी २०१६ चे ग्रामसभेत एकमताने ठराव घेण्यात आला. मात्र संबंधितांनी निघालेली रक्कमेचा भरणा न केल्याने वरिष्ठांकडे तक्रार करून पाठपुरावा करण्यात आला. मात्र वरिष्ठाकडूनही ठोस कार्यवाहीचे चिन्ह दिसत नसल्याने ६ जूनला शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. यापुढे प्रशासन नमले असून चार सदस्यीय समितीच्या अहवालानुसार ३२ हजार ९५० रूपये या प्रकरणात दोषी आढून आलेले तत्कालीन ग्रामसेविका सरपंचा व रोजगार सेवक यांचे कडून वसूल करण्याचे पत्र काढून तशी माहिती मार्गदर्शनाकरीता पाठविण्यात आले. मात्र या कार्यवाहीमध्ये तक्रारकर्ते यांचा समाधान न झाल्याने त्यांनी खंडविकास अधिकारी यांचे मार्फत विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे पुनश्च तक्रार पाठविल्याचे समजते. निवेदन देतेवेळी शिवसेना पदाधिकारी कमलेश मेश्राम, देवानंद उके, प्यारेलाल पटले, दिनेश वासनिक, मुकेश धुर्वे, मनोज पटले, पवन निर्वाण, सचिन गजभिये, सिद्धार्थ धुर्वे, डेविड खोब्रागडे आदी कार्यकर्ते हजर होते. यापुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष आहे.