शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपातादरम्यान मुलीचा मृत्यू!

By admin | Updated: May 17, 2014 23:28 IST

तालुक्यातील पिंडकेपार येथील बाळबुद्धे यांच्या दवाखान्यात एका १७ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीला आली.

साकोली : तालुक्यातील पिंडकेपार येथील बाळबुद्धे यांच्या दवाखान्यात एका १७ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीला आली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मुलीला उपचारासाठी आणणारे चार जण फरार झाले आहेत. गर्भपातादरम्यान तिचा मृत्यू झाला अशी विश्वसनीय माहिती आहे. पिंडकेपार येथे डॉ. वसंत बाळबुद्धे यांचा दवाखाना आहे. या दवाखान्यात एक मुलगी मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचा ताफा पिंडकेपार येथे पोहचला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. यावेळी पोलिसांनी डॉ. बाळबुद्धे यांना ताब्यात घेतले. मुलीला कोणत्या उपचारासाठी या दवाखान्यात आणण्यात आले याची निश्चित माहिती यावेळी देण्यात आली नाही. या संदर्भात पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, डॉ.बाळबुद्धे यांच्या सांगण्यानुसार, मुलीला कावीळ आजाराच्या उपचारासाठी आणण्यात आल्याचे सांगितले. कावीळचा आजार त्या मुलीला होता तर तिचा मृत्यू कसा झाला व मृत्यूनंतर तिच्या सोबत आलेले पळून का गेले? असे अनेक संशय व्यक्त करणारे प्रश्न निर्माण झाले. या प्रकरणी गावात विचारपूस केली असता, नाव न सांगण्याच्या अटीवर काही लोकांनी माहिती. यात सदर मुलीला तीन ते चार जणांनी डॉ. बाळबुद्धे यांच्या दवाखान्यात या मुलीला गर्भपातासाठी आणण्यात आले. गर्भपातादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे सोबत असलेले इसम घाबरुन पळून गेले असे सांगितले. डॉ.बाळबुद्धे यांच्या दवाखान्यात बरेचदा गर्भपात केले जातात अशी माहिती मिळाली. यापूर्वीही या संदर्भात डॉ.बाळबुद्धे यांची तक्रार प्रशासनाला करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय अधिकार्‍यांच्या चमूने या प्रकरणाची चौकशी केली. मात्र या प्रकरणात पाणी कुठे मुरले ते कळतेच नाही. फरार इसमांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथक तयार करुन एक पथक तुमसरकडे व दुसरे पथक गोंदियाकडे पाठविले आहे. ओळख पटविण्यासाठी या पथकासोबत डॉ. बाळबुद्धे गेले आहेत. (तालुका प्रतिनिधी)