शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

‘माॅर्निंग वाॅक’ आराेग्यासाठी की काेराेना घरात आणण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 05:00 IST

जिल्ह्यात पहाटे ४ वाजतापासून हाैशी मंडळी माॅर्निंग वाॅकला निघतात. भंडारा शहरात तर जत्राच पहायला मिळते. खात राेड परिसर, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील मुख्य रस्ते व नदीकाठ परिसरात माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅक करणाऱ्यांची गर्दी पहायला मिळते. संचारबंदी असतानाही नागरिक घराबाहेर पडत आहेत. याचाच फटका काेराेना रुग्णसंख्या वाढीवर तर बसला नाही ना, अशीही शंका व्यक्त् केली जात आहे.

ठळक मुद्देभंडारा शहरात निर्बंध असतानाही माॅर्निंग वाॅक सुरुच

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा बळी गेला. भीती आणि धास्तीचे वातावरणही बघायला मिळाले. असे असतानाही सकाळी पहाटे व सायंकाळी वाॅकला जाणाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली  दिसून येत नाही. परिणामी माॅर्निंग वाॅक आराेग्यासाठी की काेराेना घरात आणण्यासाठी केली जात आहे का, असा सवालच उपस्थित हाेत आहे.जिल्ह्यात पहाटे ४ वाजतापासून हाैशी मंडळी माॅर्निंग वाॅकला निघतात. भंडारा शहरात तर जत्राच पहायला मिळते. खात राेड परिसर, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील मुख्य रस्ते व नदीकाठ परिसरात माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅक करणाऱ्यांची गर्दी पहायला मिळते. संचारबंदी असतानाही नागरिक घराबाहेर पडत आहेत. याचाच फटका काेराेना रुग्णसंख्या वाढीवर तर बसला नाही ना, अशीही शंका व्यक्त् केली जात आहे. विनाकारण बाहेर पडू नका अशी विनंती शासन व प्रशासन वारंवार करीत असतानाही या विनंतीला तिलांजली देण्याचा प्रकार सुरु आहे.सकाळी ७ वाजतापासून किरणा व अन्य जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडतात. नागरिक तत्पूर्वीच घराबाहेर पडतात. विशेष म्हणजे माॅर्निंग वाॅकला वयाेवृध्दांपासून बालकेही जात आहेत. इव्हिनिंग वाॅकिंगचीही अशीच स्थिती आहे. जेवण झाल्यानंतर शतपावली करावी असा बेत आखून बरेचजण घराबाहेर पडत असल्याचे दृश्य आहे. शहरातील प्रत्येक वाॅर्डात अशी स्थिती बघायला मिळते. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेसाठी सूट देण्यात आली असताना या सवलतीचा दुरुपयाेग हाेत असल्याचे दिसून येते. शहरातील मैदाने, रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गर्दी थांबता थांबत नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून यावर कारवाई संबंधाने पालिका प्रशासनही अपुरे पडत आहे. वारंवार आवाहन करुनही स्थिती जैसे थे आहे. काही माॅर्निंग वाॅक करणारे हाैशी मंडळी डबल मास्क घालून फिरायला निघत असल्याचे दृष्य आहे. परंतु आपण काेराेना कॅरिअरतर बनत नाही यावर दुर्लक्ष हाेत आहे.

सवलतीचा दुरपयाेगविनाकारण माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅकला जाणाऱ्यांमध्ये सर्वच वयाेगटातील स्त्री पुरुषांचा समावेश आहे. संचारबंदीत घराबाहेर पडू नये तसेच सवलतीच्या वेळेतच घराबाहेर पडावे असा नियम असतानाही दिलेल्या सवलतीचा दुरुपयाेग खुलेआम सुरु आहे. पाेलिसांकडून सुट मिळाली आहे अशाच आव वाॅकींग करणाऱ्यांच्या वर्तनावरुन दिसून येते. काेराेना महामारीला हलक्यात घेणे कुणाचाही जीवावर बेतू शकते. ही बाब समजण्यापलीकडे आहे काय? असेच दिसून येत आहे.

काेराेनाची भीती वाटत नाही काय?

मी सातत्याने राेज फिरायला जाताे. मात्र काेराेना संसर्ग असल्यामुळे आम्ही फिरायला जायचे नाही का? मास्कचा वापर व साेशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत आहे. काेराेना हाेईल याची भीती मनात आहे. मात्र शरीर स्वास्थ्यासाठी नैसर्गीक ऑक्सिजन घेणेही महत्वाचे आहे. - एक नागरिक, भंडारा

काेराेना महामारीने अनेकजण दगावले आहे. ही बाब आम्ही जाणताे. मात्र अनेक वर्षांपासून फिरायला जाणे ही एक सवय दडली आहे. काही दिवस घरातच हाेताे. मात्र याचा परिणाम शरीरावर दिसून आला. परिणामी पुन्हा वाॅकींगला जाणे सुरु केले. मास्क व साेशल डिस्टन्सिंगचे पालन करताे.- एक नागरिक, भंडारा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या