शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मॉयलमधील ब्लास्टिंगच्या कंपनामुळे घरांना भेगा

By admin | Updated: January 22, 2017 00:37 IST

तालुक्यातील डोंगरी (बु.) येथे 'मॅग्नीज ओर' ची ओपनकास्ट खाण आहे. या खाणीतून मॅग्नीज बाहेर काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग सुरु आहे.

बाळापूरतील प्रकार : भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनची पत्रपरिषदतुमसर : तालुक्यातील डोंगरी (बु.) येथे 'मॅग्नीज ओर' ची ओपनकास्ट खाण आहे. या खाणीतून मॅग्नीज बाहेर काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग सुरु आहे. त्यामुळे मोठे हादरे बसत असून घर, शाळा, मंदिरांना भेगा पडल्या आहेत. अनेक घरे कोलमडून पडले आहेत. मात्र मॉयल प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे गावकऱ्यांसह अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार जनआंदोलन समिती तर्फे भव्य मोर्चा व आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.मॉयल डोंगरी (बु.) ने अनाधिकृतरित्या गावठान, काबिलकास्त, आम रस्ता, स्मशान भूमीवर देखील कब्जा केला आहे. तिथे अवैधरित्या मॅग्नीजचे अवैध उत्खनन सुरुच आहे. मॉयल लगतच या बाळापूर येथील गट नं. ९५, ९६, ९७ या जमिनीवर केवळ साडे चार एकरची लिज मॉयलला मिळाली असताना त्यांनी ७५ एकरवर कब्जा केला आहे. नियमानुसार ५०० मिटर दूर जर वसाहत किंवा गाव असेल तर तिथे ब्लास्टींग होवू शकत नाही. मात्र मॉयल प्रशासन हव्यासापोटी १५० ते २०० मिटरवर वसलेल्या बाळापूर गावाजवळच ब्लास्टींग करीत असल्यामुळे हादराने अनेक घरांना भेगा पडल्यात, तर अनेक घरे कोसळलेही आहेत. त्याच बरोबर ब्लास्टींगमुळे दगड उडत असल्याने अनेक जण गंभीर जखमी झाल्याचीही घटना घडली आहे. मात्र मॉयल प्रशासन गंभीर नाही. जवळपास २७५ एकर समितीवर मॉयलने अवैध कब्जा करून कोट्यवधी रुपयांची काळाबाजारी सुरु असल्याने ते गब्बर झाले आहेत. कुंभकर्णी झोपेचा सोंग घेतलेल्या मॉयल प्रशासनाला जागे करण्याकरिता व गावकऱ्यांना न्याय देण्याकरिता गावकरी तसेच अण्णा हजारे प्रणित समितीच्या वतीने तात्काळ समस्या सोडवा अन्यथा भव्य आंदोलन व आमरण उपोषणाचा इशाराही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत यावेळी भ्रष्टाचार जण आंदोलन समितीचे शंकरदादा बडवाईक, बाळापूरचे धर्मेंद्र धकेता, ओम लांजेवार, शिशुपाल दहाट सह अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)