शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी लाटेवर एकहाती विजय

By admin | Updated: May 17, 2014 23:33 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात हंसराज अहीर यांच्या विजयाने हॅटट्रिक साधली आहे. आजवरच्या त्यांच्या तीन निवडणुकांमध्ये न साधलेले मताधिक्य यावेळी मिळाल्याने या ..

आढावा मतदारसंघाचा :काँग्रेसमधील गृहकलह भाजपाच्या पथ्यावर

गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात हंसराज अहीर यांच्या विजयाने हॅटट्रिक साधली आहे. आजवरच्या त्यांच्या तीन निवडणुकांमध्ये न साधलेले मताधिक्य यावेळी मिळाल्याने या मतदार संघातील भाजपाचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. असे असले तरी मोदींच्या लाटेमुळे या विजयातील झळाळीत पुन्हा भर पडली आहे. आजवर भाजपाचा कधी नव्हे एवढ्या मताधिक्याने येथे विजय झाल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मोदी लाटेचा पुरेपूर फायदा येथे हंसराज अहीर यांना मिळाला आहे. प्रारंभी या मतदार संघातील लढतीचे चित्र तिरंगी दिसत होते. मात्र अहीर यांनी एकहाती लढाई मारली. त्यांच्या मतांची लिड दोन्ही नजिकच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मतांच्या बेरजेलाही मागे टाकणारी आहे. आर्णी विधानसभा क्षेत्रात भाजपाला मिळालेली मते महत्वाची मानली जात आहेत. या सोबतच वणी क्षेत्रातही आपली बाजू कायम राखण्यात अहीर यशस्वी झाले आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला खुद्द घरातूनच (वरोरा क्षेत्रातून) फटका बसला आहे. या ठिकाणी भाजपाने घेतलेल्या मतांसोबतच आपचे उमेदवार अ‍ॅड. चटप यांनीही मते मिळविली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाल्याने त्याचा तोटा काँग्रेसला सहन करावा लागला आहे. राजुरा क्षेत्रात चटप यांनी आपल्या मतांची मक्तदारी कायम राखली आहे. असे असले तरी येथेही जवळपास सहा हजार मतांनी भाजपाला मताधिक्य मिळाले आहे. निकालाचा कल कळताच कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच असा विजयी जल्लोष सुरू केला होता.