शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वाहनांचा गैरवापर

By admin | Updated: November 29, 2015 01:38 IST

शासकीय कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. परंतु तसे न करता तुमसर तालुक्यातील अधिकारी राज्याच्या उपराजधानीतून

इंधनावर शासनाचा होतो खर्च : जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईची करण्याची गरजतुमसर : शासकीय कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. परंतु तसे न करता तुमसर तालुक्यातील अधिकारी राज्याच्या उपराजधानीतून ये-जा करीत असून तुमसर रोड रेल्वे स्थानकावर त्यांना नेऊन सोडणे व आणणे याकरिता सर्रास शासकीय चारचाकी वाहनांचा उपयोग केला जात आहे. यामुळे शासनाला लाखो रूपये दरवर्षी इंधनावर निश्चितच खर्च करावा लागत आहे. तुमसर शहर तालुक्याचे स्थळ आहे. येथे प्रत्येक विभागाचे तालुकास्थळी मुख्यालय आहे. मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागपूर येथून दररोज ये-जा करतात. तुमसर रोड येथे पाच कि़मी. अंतरावर रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर मेल, एक्सप्रेस गाड्या थांबतात. शासकीय कार्यालयात वेळेत त्यांचे अपडाऊन होत आहे. नागपूर येथून तुमसर तालुकास्थळी किमान दररोज ८० ते ९० अधिकारी, कर्मचारी ये-जा करीत आहेत, आपल्या ये-जा करीता नियमबाह्यपणे शासकीय चारचाकी वाहनांचा सर्रास वापर करणे मात्र सुरू आहे. एकीकडे मुख्यालयी न राहणे नियमबाह्य आहे. तर दुसरीकडे ये-जा करण्याकरिता शासकीय वाहनांचा सर्रास वापर करणे हा शासकीय नियमांचा भंग करणे होय. यात शासकीय रुग्णालय तहसील कार्यालय, बँक, पंचायत समिती, कृषी विभाग, वीज विभागांचा समावेश आहे.तुमसर रोड रेल्वे स्थानकावर सकाळी व सायंकाळी या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नित्यनियमाने दर्श होते. यात शासकीय वाहने त्यांच्या दिमतीला असतात सकाळी व दुपारी विदर्भ एक्सप्रेसच्या वेळीही वाहने येथे सर्रास उभी राहतात. कार्यालयीन कामे तथा साईटवर जाण्याकरिता त्यांचा उपयोग कमी व खाजगी कामाकरिताच वाहनांचा उपयोग केला जात आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुख्यालयी राहणे हा नियम येथे पायदळी तुडविल्या जात आहे. तुमसर येथून भंडारा या जिल्हास्थळावरही अनेक कर्मचारी दुचाकी व बसने दररोज प्रवास करतात. तालुका मुख्यालयी अनेक शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, लिपीक ये-जा करतात. येथे नियम हा कागदोपत्री दिसत आहे. अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने कर्मचाऱ्यांना सुद्धा येथे मुभा मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या अपडाऊनमुळे अनेक नागरिकांना कार्यालयात कामासाठी आले असता ते जागेवर मिळत नसल्याने आल्यापावली परतावे लागते. (तालुका प्रतिनिधी)