शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाला महिलेकडून मारहाण

By admin | Updated: October 2, 2016 00:29 IST

एका अल्पवयीन मुलाने अश्लिल शिवीगाळ केली म्हणून त्या मुलाला जबर मारहाण केल्याची तक्रार ..

बाळापूर येथील घटना : गुप्तांगाला केले जखमी, गावात भीतीचे वातावरणतुमसर : एका अल्पवयीन मुलाने अश्लिल शिवीगाळ केली म्हणून त्या मुलाला जबर मारहाण केल्याची तक्रार मुलासह त्याच्या पालकांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात नोंदविली. या प्रकरणी एकमेकाच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. हा प्रकार तुमसर तालुक्यातील बाळापूर मॉईल वसाहतीत घडला.कुशाल चौधरी (१७) रा.बाळापूर हा दोन मित्रांसोबत घराजवळच्या चौकात उभा होता. चौकाशेजारी एका महिलेचे घर आहे. कुशलने अश्लिल शब्दात शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर महिला कुशालच्या अंगावर धावून आली. तिने कुशालला मारहाण केली. कुशालने तिथेच आरडाओरड केली. त्याच्या दोन्ही मित्रानी हा प्रकार कुशालच्या घरी सांगितला. प्रकृती बिघडल्याने त्याला गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या प्रकारामुळे कुशाल चौधरी व त्याचे कुटूंबीय घाबरुन गेले त्यांनी बाळापूर येथील तंटामुक्त समितीकडे हे प्रकरण दाखल केले. सदर महिलेने अश्लिल शिवीगाळ प्रकरणाची तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात केली. कुशालने दुसऱ्या दिवशी या महिलेची गोबरवाही पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी महिलेविरुध्द भांदवि २९४, ३२३, ५०६, ३४ तर कुशाल विरोधात भादंवि २९४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शुक्रवारी तुमसर येथे कुशाल चौधरी, त्याचे पालकांनी पत्रपरिषद घेऊन संबंधित महिलेविरूद्ध गुन्हा नोदंविण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी अन्यायग्रस्तानी तुमसर येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मुलावर लावण्यात आलेले आरोप मागे घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पत्रपरिषदेला हेमंत चौधरी, दिनेश ठिमरीया, मनिष मलघाटी, राजू गायकवाड, तुकाराम चौधरी, तपेश लिमजा, प्रियंका बुराडे, विनोद बुराडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)