शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालय घाणीने बरबटले

By admin | Updated: January 29, 2015 23:00 IST

‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेचे धडे देत निघालेल्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता पसरली आहे. याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान,

छतावर जाळे, भिंतीवर पिचकाऱ्याभंडारा : ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेचे धडे देत निघालेल्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता पसरली आहे. याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण असे म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद इमारतीत लागलेले विविध पोस्टर, बॅनर, याद्या, येथे विविध कामासाठी येणाऱ्या नागरिक, कर्मचाऱ्यांनी मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे इमारत बेरंग झाली आहे. इमारतीत प्रवेश करताच छतावर जाळे, भिंतीवर पिचकाऱ्या असे दृष्य पाहायला मिळते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी गावागावात धावपळ करीत आहेत. शहरापासून तर खेड्यापर्यंत या अभियानाची जनजागृती सुरू असून परिसर स्वच्छ ठेवण्याचे धडे नागरिकांना दिले जात आहेत. मात्र, जिल्हा परिषद इमारतीतच अभियान राबविण्याचा विसर पडल्याने अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे.जिल्हा परिषद इमारतीत प्रवेश करताच दर्शनी भागावर नोटीस चिपकवलेली दिसून येते. आत गेल्यावर वरच्या माळ्यावर चढताना पायऱ्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. अस्वच्छता दूर करण्यासाठी पायऱ्यांवर टाईल्स लावण्यात आले. मात्र या टाईल्सही पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. स्वच्छतागृहात प्रवेश करताच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या दुर्गंधीचा सामना नागरिकांना व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. मात्र, स्वच्छता करणार कोण, असे म्हणत सर्वच गप्प आहेत. जिल्हा परिषदेत सफाई कर्मचारी आहेत. मात्र, ते नेमकी कुठली स्वच्छता करतात, याचा थांगपत्ता लागत नाही. जिल्हा परिषद इमारतीत फेरफटका मारला असता, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून आले.कर्मचाऱ्यांच्या वेळा, शासकीय योजनांची माहिती, निवड यादी अशा विविध कागद, पोस्टर्सनी भिंती रंगलेल्या आहेत. अधिकारी सरळ आपल्या कक्षात जाऊन बसतात. त्यांच्या कक्षासमोरील परिसराची नियमित स्वच्छता केली जाते. मात्र, अन्य विभागात गेले तर अस्वच्छता दिसून येते. याचा त्रास कर्मचारी व नागरिकांना सहन करावा लागत आहे. (नगर प्रतिनिधी)