शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा स्मारकाला हुतात्मा होण्याची वेळ

By admin | Updated: January 29, 2015 23:00 IST

मजा आयेगा जब हमारा राज देखेगे की, अपनीही जमी होगी. अपना आॅसमान होगा. शहीदों की चिताओं पर लेगेंगे हर बरस मेले. वतनपर मिटने वालो का यही बाकी निशा होगा. तुमसर शहरात हुतात्मा

मोहन भोयर - तुमसरमजा आयेगा जब हमारा राज देखेगे की, अपनीही जमी होगी. अपना आॅसमान होगा. शहीदों की चिताओं पर लेगेंगे हर बरस मेले. वतनपर मिटने वालो का यही बाकी निशा होगा. तुमसर शहरात हुतात्मा स्मारकाचे केवळ अवशेष तेवढे शिल्लक आहे. ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्याकरीता प्राणाहुणी देवून होतात्म्य पत्करले ते स्मारकस्थळी लघुशंकेचे स्थळ बनले आहे.राज्य शासनाने सुमारे २५ ते ३० वर्षापुर्वी शहरातील नेहरू क्रीडांगणाजवळ मोकळ्या मैदानात हुतात्मा स्मारक तयार केले होते. सुरूवातीला हे स्थळ प्रेरणास्थ बनले होते. पुढील काळात या स्मारकाकडे दुर्लक्ष झाल्याने ते मोडकळीस आले. चॅनल गेट येथे चोरी गेले. तारे तुटले आहेत. स्मारकाचे वरचे लाकडी छत पूर्णत: तुटले आहेत. प्रशासनाचे व शासनाचे येथे दुर्लक्ष झाल्याने आता या हुतात्मा स्मारकाचे अवशेष तेवढे उरले आहेत. क्रीडांगण तथा शाळा महाविद्यालयात या परिसरात आहेत. टवाळखोऱ्यांचा येथे नेहमी घोळखा पहावयास मिळते. अनेक टवाळखोर येथेच लघुशंका करतात. या स्मारकाकडे कोणताच विभाग लक्ष देण्यास तयार नाही. येथे हुतात्म्याचा अपमान होत आहे. या स्मारकाची दुरूस्ती करावी नाही तर त्याला निदान भुईसपाट करावे, असा सूर उमटत आहे.या स्मारकाच्या दर्शनी भागावर संगमरवर दगडावर हुतात्मा भुराची चानोरे, श्रीराम धुर्वे, राजाराम धुर्वे, हरी फाये, भंदूजी लोंदासे, पांडूरंग सोनवाने, माधव पडोळे, हरी पेंडारकर, हिरालाल मेहर यांची नावे कोरली आहेत. ब्राम्हणी तुमसर, मुंढरी येथील हुतात्मा स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहेत.भारताच्या स्वातंत्र्याकरीता प्राणाहूनी देऊन हौताम्य पत्करले त्यांच्या आणि अज्ञात हुतात्म्यांचाही स्मृतीस शतश: प्रणाम करण्याची या दगडावर कोरले आहे. तुमसर नगरपरिषदेसमोर हुतात्मा स्तंभ आहे. या स्तंभाचे नुकतेच नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी सौंदर्यीकरण केले हे स्थळ येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. हुतात्मा स्मारकाच्या दुर्देशेकडे लक्ष देवून नूतनीकरण करण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. हुतात्मा स्मारक तयार झाल्यानंतर या स्मारकाकडे या विभागाने ढूंकूनही पाहिले नाही.