शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

दामदुप्पट योजनेत अनेकांना गंडविले

By admin | Updated: September 11, 2014 23:17 IST

पुणे येथील एका कंपनीचे एजंट असून ही कंपनी लक्षावधीचे कर्ज वितरीत करतो असे सांगून एजंटांनी सिहोरा परिसरातील ५० हून अधिक नागरिकांना गंडविले आहे. या एजंट विरोधात कुठलाही

एजंटांचे गोंदिया कनेक्शन : सिहोरा परिसरात बोगस एजंटचुल्हाड (सिहोरा) : पुणे येथील एका कंपनीचे एजंट असून ही कंपनी लक्षावधीचे कर्ज वितरीत करतो असे सांगून एजंटांनी सिहोरा परिसरातील ५० हून अधिक नागरिकांना गंडविले आहे. या एजंट विरोधात कुठलाही पुरावा नसल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे टाळण्यात येत आहे. अशी माहिती सुशिल कुंभारे यांनी दिली.ग्रामीण भागात दाम दुप्पट योजना राबविणाऱ्या अनेक कंपन्यांचे एजंट सक्रीय झालेली आहेत. संबंधित व्यक्ती, नातेसंबंध आदींचा परिचय देत आहेत. कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभांची माहिती हे एजंट ग्रामीण जनतेला पटवून देत आहेत. अल्पावधीत राशी दुप्पट करण्यात येत असल्याने या एजंटांच्या जाळ्यात अनेक नागरिक ओढली जात आहे. या आधी एका महिलेने चक्क महिला बचत गटांना गंडविले आहे. नंतर ही महिला गोंदिया जिल्ह्यात पसार झाली आहे. या महिलेचा आजवर थांगपत्ता लागलेला नाही. बचत गटाकडे पुरावा नसल्याने महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नाही. या प्रकरणाची चर्चा शांत होत नाही. अनेक नागरिकांना एका एजंटाने गंडविले असल्याचे प्रकरण उघडकीस आलेले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील रहिवासी असल्याचे सांगून साई प्रसाद प्रॉपर्टी लिमिटेड पुणे या कंपनीत कार्यरत असल्याची माहिती या एजंटाने सिहोरा परिसरातील नागरिकांना दिली. आधी या एजंटाने नाते संबंधात असलेल्या आप्तस्वकीयांना दाम दुप्पट योजनेत गुंतवणूक करण्याचे सांगितले. १ लक्ष रुपयाचे कर्ज प्राप्तीसाठी ४ हजार रुपये आणि ५० हजार रुपयासाठी २ हजार रुपये असे कर्जवाटपाची माहिती दिली. त्याप्रमाणे ५० हून अधिक नागरिकांनी या एजंटाकडे राशी जमा केली. एप्रिल महिन्यात राशी गुंतवणूक केली असताना एजंटाने कर्जप्राप्तीकरिता प्रयत्न केले नाही. फसवणूक करण्यात येत असल्याची बाब लक्षात येताच, तिरोडास्थित असलेल्या एजंटाचे घर नागरिकांनी गाठले. आज उद्या तुम्हाला कर्ज प्राप्त करून देतो. अशा हुलकावण्या देत या एजंटाने पाच महिन्याच्या कालावधीत साधा एक रुपयाहीनागरिकांना प्राप्त करून दिला नाही. यानंतर नागरिकांनी एजंटाच्या भ्रमणध्वनी क्रमांक अस्तित्वात नाही असे उत्तर प्राप्त होत असल्याने एजंटाने फसवणूक केल्याची खात्री नागरिकांची झाली आहे. या एजंटाचे घर गाठण्याचे नागरिकांनी सुरु केले आहे. गेल्या महिनाभरापासून एक एजंट घरीच राहत नाही. या एजंटाच्या बाबतीत सत्य माहिती सांगण्यात येत नाही. यामुळे एजंट लाखोंचा चुना लावून पसार झाल्याचे कळताच नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी काही पोलिसांना संपर्क साधला. परंतु या एजंटानेच फसवणूक केली असल्याचा पुरावा नागरिकांकडे नाही. यामुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे टाळले आहे. नागरिकांनी न्याय मिळविण्याची अपेक्षा सोडली आहे. फसवणूकीत अनेक गरीब तथा सामान्य नागरिक अडकली आहेत. १३ कि.मी. अंतरावरील तिरोडा श्हरात एजंटाचे रोज घर गाठण्यात येत आहे. कर्ज प्राप्त करण्याचा विचार नागरिकांनी सोडला असून गुंतवणूक केलेली राशी परत प्राप्तीसाठी धाव घेण्यात येत आहे. परंतु प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती ‘लोकमत’ला सुशिल कुंभारे यांनी दिली आहे. (वार्ताहर)