शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटी कर्मचाऱ्यांना कायम करा

By admin | Updated: July 29, 2016 00:39 IST

आयसीटी योजने अंतर्गत कार्यरत संगणक निर्देशक व शिक्षकांसाठी पद निर्माण करून त्यांना कायम करण्यात यावे, ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा भंडारा : आयसीटी योजने अंतर्गत कार्यरत संगणक निर्देशक व शिक्षकांसाठी पद निर्माण करून त्यांना कायम करण्यात यावे, या मागणीला घेवून भारतीय विद्यार्थी, भारतीय युवा मोर्चा व भारतीय बेरोजगार मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे इतर राज्यातील संगणक शिक्षकांना माध्यमिक शिक्षकांप्रमाणे पद निर्माण करून कायम करण्याचा निर्णय घेण्यात यावा, आयसीटी योजना टप्पा दोन मधील कार्यरत अडीच हजार संगणक शिक्षक बेरोजगार होणार आहेत. तसेच विद्यार्थी संगणक ज्ञानापासून वंचित राहणार आहे. या संगणक निर्देशक व शिक्षकांबाबत त्वरीत निर्णय घेण्यात यावा, आयसीटी योजनेतील टप्पा तीन मधील संगणक निर्देशक, शिक्षकांना पाच वर्षांसाठी निमणूका देण्याऐवजी त्यांना कायम करण्यात यावे, टप्पा चारच्या व्यवस्थीत अंमलबजावणीसाठी व शैक्षणिक विकासासाठी या योजनेचे सुत्र खाजगी कंपन्यांकडे न देता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाकडे देण्यात यावे, कंपन्यांना मार्गदर्शक संगणक निर्देशक व शिक्षकांना करारानुसार वेतन व वाढीव वेतन देण्याची सूचना देण्यात यावी, कपात करण्यात आलेला भविष्यनिर्वाह निधी खात्यावर जमा करण्यात यावा आणि याबाबतची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून फौजदारी खटले दाखल करण्यात यावे, प्रचलीत कायद्याप्रमाणे व तरतुदीनुसार महिला शिक्षकांना प्रसुती रजा देण्यात यावी, आयसीटी योजनेत कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी समितीमार्फत करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा भंडारा शाखेचे मंगेश खोब्रागडे, गिरीष वालकर, चेतन बोरकर, प्रभुद्ध रामटेके, रोहित गणवीर, करिश्मा नागदेवे, पायल नागदेवे, सरीता रहांगडाले, कांचन ब्राम्हणकर, निशा वंजारी, मिनल कोरे, सुशांत मेश्राम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)