शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘मकरसंक्रांत’ परिवर्तनाची नांदी

By admin | Updated: January 22, 2017 00:25 IST

जिथे महिला तिथे हेवे-दावे, चुगली करण्याचा प्रकार असतोच अशी परिभाषा महिलांसंबंधात वापरली जाते.

सासू-सुनेचा सत्कार : गणेशपुरातील सहकार वसाहतीचा उपक्रमप्रशांत देसाई भंडाराजिथे महिला तिथे हेवे-दावे, चुगली करण्याचा प्रकार असतोच अशी परिभाषा महिलांसंबंधात वापरली जाते. अनेकदा अनेकांची मने तुटून वादविवाद वाढतात. मात्र, गणेशपूर येथील सहकार वसाहतीतील महिलांनी एकत्र येऊन सामूहिक ‘मकरसंक्रांत’ कार्यक्रमातून आदर्श परिवर्तनाचा ठेवा समाजासमोर ठेवला आहे. मकरसंक्रांत हा महिलांच्या सामुहिक तथा वयक्तीक संबंध वृद्धींगत करण्याचा मोठा सण. या दिवसात कधी नव्हे तेवढे महिलांचे जत्थे ‘वाण’ घेण्यासाठी घराबाहेर पडतात. सुमारे १५ दिवस सायंकाळच्या सुमारास महिलांसह छोट्या मुलीही वॉर्डावॉर्डात फिरताना दिसतात. अशा या महत्वाच्या संक्रांतीच्या सणातून गणेशपूर येथील सहकार वसाहतीतील महिलांनी एकोप्याचे दर्शन घडवून येथील सुमारे ३५ कुटुंबांमध्ये आत्मीयता व सहकार्याच्या भावनेची गुंफन घातली आहे. महिलांनी राबविलेल्या हळदीकुंकूच्या सामूहिक कार्यक्रमाची ही चळवळ खरोखरच सर्वांसाठी आदर्श ठरली आहे.गणेशपूर हे भंडारा शहरालगतची ग्रामपंचायत. येथील राजेंद्र वॉर्डात सहकार वसाहत आहे. येथील २७ कुटुंब व त्यांच्याकडील भाडेकरी असे सुमारे ३५ कुटुंबाती महिला गुण्यागोविंद्याने ‘एकच घर’ असल्यासारख्या वागतात. त्यांच्या या एकोप्यातून मागील चार वर्षापूर्वी त्यांनी गणपती मंदिरात एकत्र येवून मकरसंक्रांतीचा सामूहिक कार्यक्रम साजरा करण्याचा संकल्प केला. या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण प्रत्येक महिलेने त्यात सहभाग घेतला. महिलांनी घेतलेल्या निर्णयाला कुटुंब प्रमुखांनीही प्रोत्साहन देत आर्थिक पाठबळ दिले. कार्यक्रमाच्या आखणीसाठी महिलांनी वेगवेगळी कमिटी बनवून सर्वांना कामाची जबाबदारी सोपविली. महिलांच्या या नवोपक्रमाची दखल अन्य वॉर्डातील महिलांनी घेवून समाजात वाढत चाललेल्या ‘भेदभाव भिंत’ तोडण्यासाठी आदर्श ठरू शकते.यातील प्रत्येक महिला सर्वांच्या घरी न जाता मंदिर परिसरात होणाऱ्या सामूहिक कार्यक्रमाला उपस्थित होऊन एकमेकींना वाण देतात. ‘एक वसाहत एक वाण’ हा प्रकार समाजासाठी नवीन असला तरी, त्यातून या महिलांनी दिलेला एकोप्याचा संदेश महत्त्वाचा आहे. हा आदर्श खरोखरचं समाजासाठी नवा पायंडा घालणारा आहे.सासू-सुनेचा सत्कार व बाळांची लूटवसाहतीतील महिलांनी प्रत्येक घरातील सासू व सुनेचा सत्कार करण्याचा नवोपक्रम राबविला आहे. सासुंना गृहोपयोगी साहित्य तर सुनेला प्रवासी महिला हॅण्ड बॅग भेट दिली. या कार्यक्रमात ज्यांच्या घरी छोटे बाळ आहेत अशांची सामुहिक ‘लूट’ करण्यात येते. यावर्षी चार महिने ते पाच वर्षाच्या बाळांची लूट करण्यात आली.मनोरंजन व भोजनाची मेजवानीया उपक्रमात सर्वांचे मनोरंजन व्हावे व प्रत्येकाला रंगमंच मिळावा यासाठी मनोरंजनात्मक खेळ, हळदीकुंकू व उखाणे कार्यक्रम घेण्यात आले. स्वरूची भोजनाच्या मेजवाणीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यात बालगोपाल, महिला व वृद्धांनी सहभाग घेतला.