शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रेय बौध्द विहाराचा स्थापना दिवस

By admin | Updated: January 31, 2015 23:15 IST

येथील नाशिक नगरच्या मैत्रेय बौध्द विहाराचा २० वा स्थापना दिवस आणि भारतीय राज्यघटना दिवस नुकताच अनेक कार्यक्रम आयोजित करुन साजरा करण्यात आला. यात मोटार सायकलची मिरवणूक,

भंडारा : येथील नाशिक नगरच्या मैत्रेय बौध्द विहाराचा २० वा स्थापना दिवस आणि भारतीय राज्यघटना दिवस नुकताच अनेक कार्यक्रम आयोजित करुन साजरा करण्यात आला. यात मोटार सायकलची मिरवणूक, रोगनिदान शिबिर आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथील मैत्रेय बौध्द विहारातून मोटारसायकल रॅली काढल्या गेली. ती शहराच्या मुख्य रस्त्यापासून जिल्हाधिकारी चौक, खामतलाव चौक, वैशाली नगर, शास्त्री चौक, असा मार्ग घेऊ न विहारात पोहचली. या रॅलीमध्ये पुरुष महिला, तरुण तरुणी व ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले. भारतीय तिरंगा ध्वज व निळा ध्वज हातात घेवून उपासक व उपासिका बाबासाहेबांचा जयघोष करित होते. दुपारी १२ वाजता रोगनिदान शिबिर कार्यक्रम घेण्यात आला. त्यात दंतचिकित्सक स्वप्नील धारगावे यांनी रुग्णाची तपासणी केली. सायंकाळी ५ वाजता तथागत गौतम बौध्द यांचा मुर्तीची रॅली काढण्यात आली ती नाशिक नगर व शास्त्री चौक येथून फिरुन विहारात समाप्त झाली. सायंकाळी ६.३० वाजता बुध्द वंदना घेण्यात आली. यानंतर व्याख्यानमाला घेण्यात आली. यात बौध्द व आंबेडकर विचारक मंगेश दहिवले, डॉ. संजय वाणे, नगरसेवक विनयमोहन पशिने, सिध्दार्थ चौधरी, व सुनिल भालाधरे यांचे व्याख्यान झाले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जिवनात कठिण प्रसंगाचा सामना करुन आपल्या बुध्दी कौशल्याने भारतीय राज्यघटना निर्माण केली, असे दहिवले यांनी सांगितले. ते म्हणाले भारतीय राज्यघटना सर्वांत श्रेष्ठ आहे. डॉ. संजय वाणे यांनी बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्र, राजशास्त्र व अर्थशास्त्र यात पारंगत होते. त्यांनी इतिहासातील अनेक घटनांना उजाळा देत आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या व्यक्तीत्वाचा परिचय करुन दिला. यावेळी महिलांनी स्वच्छता अभियान राबविले. यावेळी तिसऱ्या वर्गात शिकत असणाऱ्या प्रेक्षा नागदेवे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण दिले. प्रशांत रामटेके व मधुरा गजभिये यांनी गीत प्रस्तुत केले. संचालन प्रशांत देशभ्रतार व आभार भूपेश शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला विजय सावध, प्रमोद नागदेवे, अनिल पाटील, अंजिरा नागदेवे, सारिका गजभिये, नीलिमा गजभिये, मनीषा बोरकर, उज्ज्वला चिचखेडे, अण्णा बागडे, शालिनी भालाधरे, हर्षा मेश्राम, नीलम नागदेवे, सोनम नागदेवे, श्वेता लांजेवार, सचिता लांजेवार आणि नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)