शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

जातीय सलोखा कायम ठेवा

By admin | Updated: August 11, 2014 23:45 IST

जात, धर्म, पंथांचे लोक जिल्ह्यात मिळून राहतात. ते सामाजिक एकोप्याने सर्व धर्मीयांचे सण साजरे करतात. परंतु काही असामाजिक व विघटणकारी कृत्य करणारे व्यक्ती हे सामाजिक एकता भंग करतात.

भंडारा : जात, धर्म, पंथांचे लोक जिल्ह्यात मिळून राहतात. ते सामाजिक एकोप्याने सर्व धर्मीयांचे सण साजरे करतात. परंतु काही असामाजिक व विघटणकारी कृत्य करणारे व्यक्ती हे सामाजिक एकता भंग करतात. अशा असामाजिक कृत्य करणाऱ्या व्यक्ती पासून सावध राहून आपली एकता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच जिल्ह्यात जातीय सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी यांनी केली. जिल्हास्तरीय जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, समितीचे सदस्य सचिव पोलीस अधिक्षक कैलास कणसे, तहसीलदार सुशांत बनसोडे, जिल्ह्यात जातीय सलोखा समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली असून सुद्धा जातीय सलोख्याचा प्रश्न नेहमी उद्धवत असतो. त्यासाठी जनतेनी आपली मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक बांधिलकीची भावना कायम ठेवणे जरूरीचे आहे. सद्सद विवेक बुद्धीचा अंगिकार करावा, सोशल मिडीयाद्वारे होत असलेल्या अफवावंर विश्वास ठेवू नये, शितला माता मंदिर घटनेबाबतची पुनरावृत्ती होवू नये याची दक्षता घ्यावी. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या म्हणी प्रमाणे आपले वागणे असावे. समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनेनुसार सप्टेंबर पासूनदर लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जातीय सलोखा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही त्याम्हणाल्या. उपस्थितांनी केलेल्या सुचनेनुसार लवकरच अवैध दारू विक्रीबाबात सलोख चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल व त्यावर योग्य ती उपाययोजना करण्यात येईल. जातीय सलोखा समिीची सभा नियमित दरमहा घेण्यात येईल. शितला माता मंदिराबाबत कायदेशिर सखोल सल्ला घेवून त्यावर पोलीस व जिल्हा प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येईल. तसेच सोशल मिडीयावर जे व्यक्ती असामाजिक कृत्य करतात त्याघटकांवर कडक नजर ठेवून कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधीनी मनोगत व्यक्त करून सूचना केल्या. प्रास्ताविक व संचालन उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर आनंद भोईटे यांनी मानले. (प्रतिनिधी)