शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी हे देशाचे भूषण

By admin | Updated: January 25, 2015 23:09 IST

महात्मा गांधीजींच्या एका पैलूवर एका दिवसाचे चर्चासत्र घेतले तरीही ते कमी पडतील. गांधीजींने जे देशासाठी केले ते आजन्म न विसरण्यासारखे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी गांधीजींचे गुण

राष्ट्रीय चर्चासत्र : अशोक गोमासे यांचे प्रतिपादनपालोरा/चौ. : महात्मा गांधीजींच्या एका पैलूवर एका दिवसाचे चर्चासत्र घेतले तरीही ते कमी पडतील. गांधीजींने जे देशासाठी केले ते आजन्म न विसरण्यासारखे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी गांधीजींचे गुण अंगीकारायला पाहिजे. गांधीजी हे देशाला लाभलेले एक भुषण होत, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांनी केले. डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढा कोसरा येथील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे मराठी विभाग, इंग्रजी विभाग, समाजशास्त्र विभाग व इतिहास विभागाद्वारे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुण मोटघरे होते. उद्घाटक म्हणून डॉ. अशोक गोमासे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापिठाचे डॉ. के.सी. देशमुख, डॉ. माधुरी नासरे, डॉ. माधव पात्रीकर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी ‘मराठी साहित्यातील गांधीवाद’ यावर चर्चासत्र करण्यात आले. विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. अनिल दडमल यांनी गांधीवादाने प्रभावित झालेले मराठी कादंबरी कविता, नाटक, कथा व गांधीजींचे आत्मचरीत्र यांचा आढावा घेण्यात आला. डॉ. माधव पात्रीकर व आर.एस. मुंडले यांनी गांधी थॉटस या विषयावर प्रबोधन केले. अशोक मोहरकर विद्यालयाचे प्रा. लालचंद रामटेके यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. माजी प्राचार्य डॉ. एम.एम. रामटेके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजीच्या नेतृत्वाखाली महिलांचा सहभाग या विषयावर आढावा घेतला होता. डॉ. संजय पोहरकर यांनी गांधी विचार हा जगाला तारणारा आहे, असे विचार मांडले. संचालन प्रा. डॉ. अनिल बोपचे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत बुराडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कामराज रामटेके यांनी केले. (वार्ताहर)