शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात महिलांची मते ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

महिलांमध्ये हळूहळू राजकारणाच्या चर्चा रंगत आहेत आणि विशेष करून त्यांनाही राजकारण हे त्यांचे माध्यम वाटू लागले आहे, हे महत्वाचे आहे. विविध पक्षांनी व नेते मंडळींनी ऐन निवडणुकीच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाचा जनसामान्यांवर काय परिणाम होईल? याचा विचारच केलेला दिसत नाही. परंतु आधुनिक काळातील महिला भगिनी हा विचार करू लागल्या आहेत.

ठळक मुद्देभंडारात महिला मतदार अधिक : गावागावांत महिलांच्या चर्चेचा विषय विधानसभा निवडणूक

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निवडणूक म्हणजे पुरुषांची मक्तेदारी, असा समज असला तरी आता शहरी आणि ग्रामीण भागातील महिला ही मोठ्या हिरीरीने निवडणुकीत भाग घेत आहेत. गावागावांत महिलांच्या चर्चेचा विषय सध्या निवडणुकच आहे. भंडारा जिल्ह्यातील तीनही मतदार संघात निम्मे मतदार असलेल्या महिलांची मते निर्णायक ठरणार आहेत.विधानसभा निवडणुकांचे पडघम सर्वत्र वाजू लागले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या पक्षांची असलेली चुरस वाढली आहे. इतकेच नव्हे तर निवडणुका तोंडावर असताना केले जाणारे पक्षांतर याबबत सर्वत्र चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. चूल व मुल या संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलामध्ये याविषयी चर्चा रंगत आहेत.महिलांमध्ये हळूहळू राजकारणाच्या चर्चा रंगत आहेत आणि विशेष करून त्यांनाही राजकारण हे त्यांचे माध्यम वाटू लागले आहे, हे महत्वाचे आहे. विविध पक्षांनी व नेते मंडळींनी ऐन निवडणुकीच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाचा जनसामान्यांवर काय परिणाम होईल? याचा विचारच केलेला दिसत नाही. परंतु आधुनिक काळातील महिला भगिनी हा विचार करू लागल्या आहेत.भंडारा जिल्ह्याच्या तीनही विधानसभानिहाय मतदार यादीत ९,९०,६६५ मतदारांची नोंद आहे. पुरुष मतदारांची संख्या ४,९८,८२४ आहेत, तर ४,९१,८४१ महिला मतदार आहेत. सहाजिकच पुरुष मतदारापेक्षा महिला मतदारांची संख्या कमी आहे. तरीही येत्या निवडणुकीत महिला वर्गाची मते खऱ्या अर्थाने निर्णायक ठरतील. यात वाद नाही. स्थानिक स्वराज्य संस्था असो, पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद, प्रत्येक ठिकाणी महिला भगिनींनी जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत. पक्षामुळे असो वा आरक्षणामुळे अथवा अचानक मिळालेली संधी परंतु स्वत:चे घर सांभाळून अधिकची जबाबदारी त्या पेलत आहेत.राजकारणामध्ये महिलावर्गाची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी आहे. नेतृत्वासाठी पुढे आलेल्या महिला कमी असल्या तरी त्यांना राजकारण कळत आहे. राजकारणासाठी राजकारण की स्वार्थासाठी राजकारण हेही उमजू लागले आहे. इतकेच नव्हे तर आपापसात त्या चर्चाही करीत आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महिला वर्गाची मते निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहेत.गृहिणी महिला देखील प्रिंट किंवा इलेटॅनिक्स माध्यमांद्वारे घडामोडीकडे लक्ष ठेवून आहेत. पक्षनिष्ठा म्हणून आजही गावातील, शहरातील कुटुंब पक्षाला पाठींबा देतात. पक्षाकडून मग कोणताही उमेदवार दिला जातो त्याला डोळे झाकून पाठिंबा देतात असे असले तरी सद्यस्थितीत भेडसावणाºया समस्यांवर महिला वर्ग तिखट प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.गगनाला भिडणारी महागाई असो, महिला सुरक्षा असो त्याचप्रमाणे गावातील, शहरातील विकासकामे असोत वा रस्ते, पाणी आदी प्रश्नांवर त्या चर्चाची विनीमय करीत आहेत. सतत भेडसावणाºया समस्या सोडविण्याऐवजी केवळ आपल्यापुरता सिमीत विचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा सर्वसामान्य उमेदवार बरा अशी प्रतिक्रिया ऐकू येऊ लागली आहे. स्वत:पेक्षा गावच्या किंवा भंडारा जिल्ह्याचा विकास त्यांना कळू लागला आहे. जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या ६,९८३ एवढी कमी आहे. सदर आकडेवारी ३१ ऑगस्ट रोजीपर्यतची आहे.राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी अर्थात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता महिलावर्ग एकजुटीने बाहेर पडल्या तर फार मोठा बदल घडवू शकतात. इतकेच नव्हे तर मतदानाकरिता बाहेर पडण्याचे टाळले तरीही बदल संभवतो. एकूणच दोन्ही निर्णय महिलांचे आहेत. जे महत्वपूर्ण आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यातून विधानसभेसाठी केवळ तीन महिला रिंगणात आहेत. भंडारात तर एकही महिला उमेदवार नाही.

टॅग्स :bhandara-acभंडारा