शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात होणार ‘मचाण पर्यटन’!

By admin | Updated: August 1, 2016 00:20 IST

भंडारा वनवृत्त क्षेत्रांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैध कटाई व प्राण्यांची शिकार सुरू असल्याची तक्रार ग्रीन हेरिटेज संस्थेने वनमंत्री मुनगंटीवार यांना केली.

प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र : ग्रीन हेरिटेज संस्थेच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली दखलभंडारा : भंडारा वनवृत्त क्षेत्रांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैध कटाई व प्राण्यांची शिकार सुरू असल्याची तक्रार ग्रीन हेरिटेज संस्थेने वनमंत्री मुनगंटीवार यांना केली. संस्थेच्या पत्राची दखल वनमंत्र्यांनी घेवून चौकशीचे आदेश दिले आहे. सोबतच यावर आळा बसावा यासाठी ‘मचाण पर्यटन’ कार्यवाहीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले आहे.भंडारा येथील ग्रीन हेरिटेज ही संस्था पर्यावरणासंबंधी काम करीत आहे. मागील काही दिवसात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कटाई व वन्यप्राण्यांच्या शिकारी होत आहे. या गंभीर बाबीची तक्रार ग्रीन हेरिटेजच्या पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली. संस्थेच्या पत्राची तातडीने त्यांनी दखल घेतली. संस्थेचे अध्यक्ष सईद शेख यांनी पाठविलेल्या तक्रारीची दखल घेत वनमंत्री मुनगंटीवार यांनी, वृक्षांची कटाई व वन्यप्राण्यांची शिकारीची दखल घेतली. याची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी व अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना वनमंत्र्यांनी केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)पर्यटकांमध्ये वाढ अपेक्षितग्रीन हेरिटेज या संस्थेने वनमंत्री मुनगंटीवार यांना शिकार व वृक्षतोडीवर आळा बसावा, यासाठी मचाण पर्यटन सुरू करण्याची मागणी केली. भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. येथे पर्यटकांमध्ये मोठी वाढ होवू शकते. त्यामुळे मचाण पर्यटन सुरू करावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पुढील योग्य कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहे.