शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवरून ‘भाग्यशाली’ ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: January 31, 2015 00:32 IST

‘बेटा मै बोल रही हुँ, शिमला के आश्रम से, अंकशास्त्र के अनुसार हमारे आश्रमने आपका मोबाईल नंबर चुना है. आप बहुत भाग्यशाली हो. जिन्हे हमारे आश्रम से मिलनेवाला है भाग्योदयी यंत्र.

भंडारा : ‘बेटा मै बोल रही हुँ, शिमला के आश्रम से, अंकशास्त्र के अनुसार हमारे आश्रमने आपका मोबाईल नंबर चुना है. आप बहुत भाग्यशाली हो. जिन्हे हमारे आश्रम से मिलनेवाला है भाग्योदयी यंत्र. इसके लिए आपको सिर्फ दो हजार ९०० रु पये देने होंगे’, असे कॉल तुमच्या मोबाईलवर आले तर सावध रहा. नागरिकांना ‘ईमोशनल ब्लॅकमेल’ करून ठगविण्याचे प्रकार वाढले आहेत. टेलिमार्केंटिंगचा गैरवापर करून ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आले आहे. सध्या मोबाईलवर असे अनेक प्रकारचे मॅसेज आणि कॉल येत आहेत. ईश्वर आणि धार्मिक भावनेचा गैरफायदा घेऊन विविध यंत्र विकण्याचा सपाटा सुरू आहे. एवढेच नाही तर दूरचित्रवाहिन्यांवरून ग्राहकांना भुरळ घातली जात आहे. प्रसिद्ध व्यक्तीच्या वलयाचा फायदा घेत त्यांना फायदा झाला. तुम्हालाही फायदा होईल, असे म्हणत, भाग्योदय यंत्र ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. धार्मिक संभाषण करून आधी भावनिक करायचे आणि त्यानंतर यंत्राचा बाजार मांडून त्याला ब्लॅकमेल करायचे असा हा प्रकार आहे. याला अनेक नागरिक बळी पडत आहेत. कर्जासाठी झाली आपली निवड !आमची दिल्लीतील एक प्रसिद्ध फायनान्स कंपनी आहे. कंपनीने कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी तुमची निवड केली आहे. एक लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला केवळ तीन टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाईल. कर्ज मिळण्यासाठी आवश्यक ‘प्रोसेसिंग फी’ करिता कर्जाच्या रकमेच्या १० टक्के म्हणजे १० हजार रुपये रोख किंवा चेकद्वारे कंपनीच्या खात्यात जमा करा, त्यानंतर चार दिवसात तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल, असा फोन भंडारा सचिन गिऱ्हेपुंजे यांना आला. त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे समोरील व्यक्तीने फोन ठेवला. सतर्कतेमुळे त्यांची फसवणूक टळली. लालसेपोटी समोरची व्यक्ती अशा कॉल्सच्या जाळ्यात अडकतात व पैसे मिळविण्यासाठी आहे त्या रकमेपासूनही हात धुवून बसतात. (नगर प्रतिनिधी)